कल्याणमध्ये  तरुणीवर  चाकुने हल्ला

हल्ल्यात तरुणी मृत



कल्याण : ( शंकर जाधव ) : कल्याणमध्ये  एका तरुणीवर भरदिवसा दोघांनी चाकूने भोसकून हत्या  हत्या केल्याची घटना घडली असून  कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या कांदा बटाटा मार्केट समोर घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असताना डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
सनम करोटीया असे हल्लात मृत पावलेल्या तरुणीचे नाव असून ही  तरुणी आपल्या  मित्राला भेटण्यासाठी दुचाकीवरून आली होती. दोघा मित्रांशी  ती बराच गप्पा मारत बोलता बोलता अचानक मोठ्याने  वाद सुरु झाला.त्यामुळे सनम  आपल्या स्कुटीवरून तेथून जायला निघाली असताना सोबत असलेल्या त्या दोन तरुणांनी तिच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला . या  हल्ल्यामुळे सनम गाडीवरून पडली. त्यानंतर हल्ला करणारे ते दोघे तरुण तेथून  पळून गेले. याबाबत लागलीच बाजार समिती मधील व्यापाऱ्यांनी आणि ग्राहकांनी सदर घटनेची माहिती  पोलिसांना दिली. हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीला उपचारासाठी   रुग्णालयात दाखल केले असताना असताना डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याबत्चा अधिक तपास पोलिस करत आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post