रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानावर गुन्हा दाखल...
डोंबिवली ( शंकर जाधव ) जनतेचे रक्षण करणारे पोलीस जर कायद्या मोडतात तेव्हा नागरिकांनी कोणावर विश्वास ठेवायचा असा प्रश्न निर्माण होतो.महिला कर्मचाऱ्याचा पोलीस ठाण्यात काम करत असताना तिच्या परवानगी नसतात मोबाईलवर व्हिडिओ काढण्याप्रकरणी एका रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांवर डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, मनफुल सिंग ( ५०) असे गुन्हा दाखल झालेल्या रेल्वे सुरक्षा बलातील जवानांचे नाव आहे. गुरुवार १५ ऑगस्ट रोजी फिर्यादी महिला कर्मचारी डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात नेहमीप्रमाणे काम करत होत्या.त्यावेळी मनफुल सिंग हे यांनी कामानिमित्त लोहमार्ग पोलीस ठाण्यात आले होते.मनफुल सिंग यांनी फिर्यादी महिला कर्मचाऱ्याची परवानगी न घेता त्या काम करत असतानाचा १० संकेदाचा व्हिडिओ आपल्या मोबाईल वरून काढला.महिला कर्मचाऱ्याच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी मनफुल सिंगला जाब विचारत त्याच्याकडील मोबाईल चेक केला.संतापलेल्या महिला कर्मचाऱ्याने वपोनी सतीश पवार यांच्याकडे सदर प्रकार सांगितला.वपोनी पवार यांनी महिला कर्मचाऱ्यांच्या फिर्यादीवरून मनफुल सिंग यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.या गुन्हयाचा तपास सुरू आहे.
Post a Comment