दोन दिवस कारखान्यातील उत्पादन बंद ठेवण्याच्या दिल्या
होत्या  सूचना..


डोंबिवली- ( शंकर जाधव ) अतिवृष्टीचा परिमाण  डोंबिवलीतील एमआयडीसीतील कारखान्यांच्या उत्पादनावर झाला .रासायनिक कंपन्यांतुन सोडण्यात येणारे पाण्यावर  प्रक्रिया केली जाते. त्या प्रक्रिया केंद्रातील यंत्रणा जलमय झाल्याने बंद पडली होती. त्यामुळे  सांडपाणी प्रकिया केंद्र निकामी झाल्याने कारखान्यातील उत्पादन बंद करावे अश्या सूचना कारखान्यांना  सीईटीपि ( सांडपाणी प्रकिया केंद्र)  कार्यालयाकडून करण्यात आली होत्या. गेल्या तीन दिवसात अतिवृष्टीने सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे अतोनात नुकसान झाले आहे.कार्यालयातील संगणक यंत्रणा, मशिन्स, कार्यालय, प्रयोगशाळा  यांचे नुकसान झाले. त्याचप्रमाणे रासायनिक पावडरच्या गोणी,  प्रयोग शाळेतील रसायन असे नुकसान झाले.कार्यालयांच्या बाहेर ऑइल आणि ग्रीसिंग टॅंक पूर्णपणे पाण्यात गेले.जनरेटर, मोटर्स याचेही नुकसान झाले आहे.यात १० ते १२ लाखाचे नुकसान झाल्याची माहिती सीईटीपीचे अध्यक्ष देवेन सोनी यांनी दिली.
कॉलिटी इंडस्ट्रीज, इंडो माईन्स,उनीलॅब मेट्रो पोलीटन,जे.के.फर्निचर, क्रिस्टल इंडिया, पल्लवी इंटरप्राईजेस, सप्तवर्ण केमिकल, हिंदुस्थान मोनोमर या कंपन्यात पाणी साठल्याने कंपन्याचे नुकसान झाले .गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अतिवृष्टीने डोंबिवली एमआयडीसी भागातील कारखाने जलमय झाले. त्याचबरोबर कारखान्यांसोबत सांडपाणी प्रक्रिया केंद्र ( सीईटीपी ) अतिवृष्टीने मोठे नुकसान केले. सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या परिसरात कारखान्यात अडीच फुट पाणी साठले होते. फेज -२ भागातील सोनारपाडा ते अभिनव विद्यालयापर्यतच्या भागाला नदीचे स्वरूप आले होते. या परिसरात सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे कार्यालय आहे. या केंद्राचा परिसर जलमय झाला होता. त्यामुळे प्रक्रीया यंत्रणा बंद पडली होती.त्याचा परिणाम कारखान्यातील उत्पादनावर झाला.सुमारे फेज-२ मध्ये रासायनिक कंपन्या असून त्या कंपन्यातून उत्पादन निर्मिती नंतरच्या सांडपाण्यावर प्रक्रिया केंद्रावर प्रक्रिया केली जाते.परंतु केंद्राचा परिसर जलमय झाल्याने व प्रक्रिया केंद्राची यंत्रणा निकामी झाल्याने कारखान्यातून येणाऱ्या सांडपाण्यावरील प्रक्रिया बंद झाली होती. त्यामुळे सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या कार्यालयावरून कारखान्याचे उत्पादन दोन दिवस बंद ठेवण्याच्या ऑललाईन सूचना दिल्या होत्या. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण महामंडळालाही कळविण्यात आले होते. सांडपाणी प्रक्रिया केंद्रासोबत अनेक रासायनिक कारखान्याचे नुकसान झाले. याबाबत झालेल्या नुकसानीचा अहवाल तयार करण्याचे काम काही घेण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post