डोंबिवली :- ( शंकर जाधव ) महापुराचे संकट ओढवलेल्या कोल्हापूर व सांगलीतील पूरग्रस्तांना वैद्यकीय उपचार देण्यासाठी डॉक्टरांची पथके रवाना झाली आहे. या डॉक्टरांना वैद्यकीय उपचार करण्यासाठी विविध ठिकाणाहून औषधांचा पुरवठा होत आहे. डोंबिवलीतील नाहर मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटलने जीवनावश्यक औषधे कोल्हापूर व सांगली येथे पाठवली आहेत.पूराचे पाणी ओसरल्यानंतर मृत जनावरे , कुजलेला कचरा, शैवाळयुक्त गाळ, लाकडाचे औढके, अस्वच्छ पाण्याचे भरलेल्या बाटल्यांमुळे अनेक परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यांना या अनारोग्य वातावरणामुळे साथीचे रोग झपाट्याने वाढत असून गंभीर परीस्थित निर्माण होऊ शकते.यासाठी पूरग्रस्त असलेल्या गावागावात विविध ठिकाणाहून पोहोचली आहेत. तेथे जीवनाश्यक औषधांचा तुटवडा पडू नये म्हणून महत्वाची औषधे पाठवण्यात आली आहेत.
गेल्या एक वर्षापासून डोंबिवलीतील दावडी नाका पेट्रोलपंपाजवळ काही विशिष्ट रुग्णांसाठी सवलतीच्या दरात सामाजिक बांधलकी म्हणून रुग्ण सेवा देत आहेत. आर्थिक प्रगतीपेक्षा दिव्यातील सामाजिक बांधलकी म्हणून दोन तरुणांनी एक वर्षापूर्वी नाहूर मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल निर्मिती केली. एकीकडे बक्कळ पैसा देणाऱ्या बांधकाम व्यवसायात शिरत असताना या दोन तरुणांनी रुग्णसेवेचा ध्यास घेतला आहे. कोल्हापूर येथे स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकार समोर पूरग्रस्थातांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आव्हान उभे राहिले आहे. या आव्हानातील गंभीरता कमी करण्यासाठी नाहर मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटलने जीवनावश्यक औषधे पाठवली आहेत. याबाबत हॉस्पिटलने संचालक दिनेश पाटील म्हणाले, रुग्णसेवा ही महत्वाची असून आज जी नैसगिक आपत्ती आली आहे त्यात साथीचे रोग झपाट्याने वाढत आहेत. त्यासाठी आमच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून जीवनावश्यक औषधे त्या ठिकाणी पुरवण्याचे काम कट आहोत. तर डॉ. कुणाल गायकर म्हणाले, पुराचे पाणी ओसल्यानंतर पसरणारे साथीचे रोग नियंत्रणात आणण्यासाठी वैद्यकीय उपचार वेळेवर घेणे आवश्यक आहेत.पूरग्रस्तांच्या प्रमाणात औषधे कमी पडण्याची शक्यता असते. त्यासाठी नाहर मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटलवतीने साधारतः ताप, सर्दी, पडसे यासाठी लागणारी औषधे, इंजेक्शन, सलायन पाठवीत आहोत. तर अरुण जांभळे म्हणाले,पुरामुळे तेथील दवाखाने आणि रुग्णालयातील औषधे खराब झाल्याची शक्यता आहे. प्राथमिक उपचारांची औषधे पाठवीत आहोत. औषधे घेऊन जाण्यासाठी कोल्हापूराहून आलेले वैभव माळवे म्हणाले, गेल्या सहा दिवसापासून कोल्हापूर व इतर भागात महापूर आलेला आहे.आता पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तू मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्याच बरोबर विविध पूरग्रस्त ठिकाणी वैद्यकिय शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे, येथे औषधे कमी पडू नयेत म्हणून औषधांचा पुरवठा करण्याचे आवाहन कोल्हापुरांमार्फत करीत आहोत. नाहर मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटलप्रमाणे इतर हॉस्पिटलप्रमाणे इतर हॉस्पिटलनेही मदत करावी.
Post a Comment