डोंबिवलीत दुकानासमोरील साचलेल्या घाण पाण्यात धुतल्या जातात भाज्या ...
व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल..
व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल..
डोंबिवली ( शंकर जाधव) आपण भाज्या घेताना त्या किती रुपयांना आहेत याची विचारणा करतो. परंतु आपण विकत घेतलेल्या भाज्या कुठल्या पाण्यात धुतल्या जाताय हे मात्र माहीत नसते.डोंबिवलीत एक भाजी विक्रेत्या महिलेने चक्क दुकानासमोरील साचलेल्या पाण्यात भाज्या धूत असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
डोंबिवली पश्चिमेकडील स्टेशनबबाहेरील १०० मीटरच्या पुढे घनश्याम गुप्ते रोडवरील राजूल ज्वेलर्सचा समोर एक महिला भाजी विकण्यासाठी बसली होती.पाऊस खूप आल्याने या भाजीविक्रेत्या महिलेने चक्क दुकानासमोरील साचलेल्या घाण पाण्यात भाज्या धुतल्या.एका जागरूक डोंबिवलीकराने आपल्या मोबाईल मध्ये हा प्रकार कैद करत याचा व्हिडीओ काढला.या व्हिडिओच्या सोशल मिडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.अश्या भाज्या खाल्याने रोगजंतू आपल्या शरीरात जाऊ आजारी पडण्याची शक्यता असते.
Post a Comment