अतिधोकादायक इमारतीतील स्लॅबचे प्लास्टर अंगावर पडून रहिवाश्याचा जागीच मृत्यू....


डोंबिवली( शंकर जाधव) डोंबिवली पश्चिमेकडील स्टेशनजवळील अतिधोकादायक इमारतीतील स्लॅबचे प्लास्टर अंगावर पडून रहिवाश्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवार रात्री सात वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत स्थानिक नगरसेवक शैलेश धात्रक यांनी इमारतमालकाला दोषी ठरले आहे.पालिका प्रशासनाने इमारत मालकाला सदर इमारत अति धोकादायक असल्याची नोटीस बजावली होती.
  
विकास विनय फडके ( ५२)असे या दुर्देवी  दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या रहिवाश्याचे नाव आहे.ही इमारत सुमारे  ४० वर्षांपूर्वीची असून या इमारतीला पालिकेने अतिधोकादायक म्हणून  जाहीर केली होती.बुधवारी या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील एका घरात विकास फडके हे झोपले होते.अचानक घरातील स्लॅबचे प्लास्टर अंगावर पडले.यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक शैलेश धात्रक, पालिकेचे अधिकारी आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी धावत आले.याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी इमारत मालकाला नोटीस बजावल्याचे सांगितले.तर स्थानिक नगरसेवक शैलेश धात्रक यांनी या घटनेला इमारतमालक जबाबदार असल्याचे सांगितले.तर इमारतीच्या तळमजल्यावर १० गाळे असून ही घटना घडूनही दुकानदारांनी दुकान सुरूच ठेवले होते.दरम्यान ही घटना घडूनही पालिका प्रशासन दुकानदारांना दुकान रिकामे करण्यास अपयशी ठरले.

Post a Comment

Previous Post Next Post