डोंबिवली : ( शंकर जाधव ) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने डोंबिवली शहर शाखेच्या वतीने डोंबिवलीतील शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पूर्वेकडील पाथर्ली येथे ध्वजा करण्यात आले. यावेळी इंदिरा नगर शाखेचे प्रभाग अध्यक्ष तेजस जोंधळे, उपाध्यक्ष धम्मपाल सरकटे, कार्याध्यक्ष राजू खिल्लारे, रमेश भालेराव, अमोल मोरे, संदीप पाईकराव, मंगेश कांबळे, उमेश साळवे, देविदास पठाडे, नितीन इंगोले,राहुल लहाने आणि कार्यकर्ते नागरिक मोठ्या प्रमणात ध्वजारोहणासाठी उपस्थित होते. प्रभाग अध्यक्ष धम्मपाल सरकटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. ध्वजारोहण करण्यापूर्वी डॉ.बाबासाहेब आंबेड यांच्या पुतळ्यास पुष्पहार अपर्ण केले.
Post a Comment