डोंबिवलीत भाजपचा जल्लोष
डोंबिवली :- ( शंकर जाधव ) केंद्र शासनाने जम्मू काश्मीर मधील ३७० कलम रद्द करण्याचा जो ऐतिहासिक निर्णय घेतला त्याबद्दल डोंबिवलीतील इंदिरा चौकात भाजपाने फटक्यांची आतिषबाजी करत ढोल ताश्यांच्या गजरात जल्लोष केला.यावेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, इतिहास अभ्यासक तथा प्रवचनककर सचिददानंद शेवडे, कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब, शशिकांत कांबळे, डोंबिवली शहराध्यक्ष संजीव बिरवाडकर यासह पूनम पाटील, वर्षा परमार,डॉ.माधुरी जोशी, पंढरीनाथ म्हात्रे, रवीसिंग ठाकूर, प्रज्ञेश प्रभुघाटे, पवन पाटील, रणजित जोशी, रसिका पाटील, राजेश म्हात्रे, मोरेश्वर भोईर, मुकेश पांडे, नगरसेवक संदीप पुराणिक, राधिका मोरे, मोहन नायर, प्रकाश पवार,प्रतिभा पाटील, रवींद्र पाटील, उमेश साळवी,विक्रांत जोशी, श्रद्धा जोशी यांनी इंदिरा चौकात
जल्लोष केला.
Post a Comment