अखिल कोकण विकास महासंघाच्या वतीने डोंबिवलीत नारळ लढविणे आणि सलामी दहीहंडी.


डोंबिवली ( शंकर जाधव )   अखिल कोकण विकास महासंघाच्या वतीने डोंबिवली पश्चिमेकडील गुप्ते रोडवर नारळी पोर्णिमेनिमित्त नारळ लढविणे आणि सलामी दहीहंडीचा कार्यक्रम पार पडला.यावेळी सूमारे ५० गोविंदा पथकाने सलामी दिली. याचे आयोजन माजी नगरसेवक नंदकुमार धुळे यांनी केले होते.या कार्यक्रमाला महापौर विनिता राणे, संकेत चव्हाण , भाजप कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी हर्षद सावंत, राष्ट्रवादीचे पदाधिकारी निरंजन भोसले, राजेंद्र नांदोस्कर, जनहित प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश काळे, रिक्षा युनियनचे ज्येष्ठ पदाधिकारी उदय शेट्टी, शिवसेनेचे पदाधिकारी श्रीकांत बिरमुळे आदी मान्यवर उपस्थित होते.अनेक गोविंदा  पथकांनी सलामी दिल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ आणि रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post