डोंबिवली : ( शंकर जाधव ) स्वातंत्र्य दिनानिमित भाजप नगरसेविका मनीषा धात्रक यांच्या प्रभागातील डोंबिवली पश्चिमेकडील एलोरा सोसायटीत येथे शाळकरी विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी भाजप नगरसेवक शैलेश धात्रक, पदाधिकारी, परिसरातील नागरीक कार्यकर्ते आणि उपस्थित होते.देशाचे पंपप्रधान नरेंद्र मोदि यांनी कश्मीर येथे ३७० कलम रद्द केल्याबद्दल नगरसेविका धात्रक यांनी स्वागत केले.तसेच अतिवृष्टीने कोल्हापूर आणि सांगली येथ पूरपरिस्थितीत ज्यांना जीव गमवावा लागला त्या दुर्दैवी नागरिकांना श्रद्धांजली अपर्ण करण्यात आली.प्रभागातील अपूर्ण राहिलेली विकास कामे पूर्ण करू अशी आशा व्यक्त करत प्रभागातील नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
Post a Comment