🔴 रेशनकार्ड साठी बीकेडी चे निवेदन 🔴

गरीब आदिवासी लोकांचे न्युक्लिअस बजट योजनेतून रेशनकार्ड बनवून देण्याची केली मागणी.


प्रतिनिधी   अजय भरसट
  ➡️ शिरपूर तालुक्यात आदिवासी समाजाचा रेशनकार्ड संदर्भात विचार केला तर, कित्येक वर्षांपासून रेशनकार्ड ची समस्या जैसे थेच आहे. नवीन रेशनकार्ड बनवणे, नाव समावेश करण्यासाठी कित्येक समस्या येतात. त्यापैकी सर्वात मोठी अडचण म्हणजे कार्ड बनवण्यासाठी येणारा खर्च..... याच आर्थिक अडचणीचा विचार करून,आदिवासी विकास विभागाच्या धोरणानुसार.....बिरसा क्रांती दलाच्या वतीने शिरपूर तालुक्यातील आदिवासी समाजातील लोकांचे रेशनकार्ड बनवून देण्यासाठी निवेदन देण्यात आले.

                 आदिवासी विकास विभागामार्फत राबवली जाणारी न्युक्लिअस बजट योजनेंतर्गत तालुक्यातील गरीब आदिवासी समाजाला रेशनकार्ड बनवून देण्यासाठी बिरसा क्रांती दलाच्या वतीने आज मा. तहसीलदार व तालुका पुरवठा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बीकेडी चे नाशिक विभागीय अध्यक्ष मनोज पावरा, तालुका सचिव गेंद्या पावरा उपस्थित होते.

 

Post a Comment

Previous Post Next Post