वरप मध्ये बिल्डरांच्या कार्यालयात ग्राहक महिलेला अमानुष मारहाण...टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा

 


रोशन उबाळे - कल्याण :-----  कल्याण ग्रामीण भागातील कल्याण उल्हासनगर शहरालगत  गावांचा विकास झपाट्याने होत असताना चाळी बांधणारे व्यावसायिक यांनी म्हारल ,वरप, कांबा ,  रायते , गोवेली , बापसई म्हसकल , या ग्रामपंचायती असणाऱ्या भागात शिरकाव केला आहे  त्यामुळे गरजू ,सर्वसामान्य नागरिक चाळीत घर विकत घेण्याचा प्रयत्न करीत आहे त्यामुळे पैसे घेऊन ताबा देत नाही आणि पैसे परत मागितल्यावर मारहाण केल्याचे प्रकार घडत आहे  वरप गावात बिल्डरांच्या ऑफिस मध्ये अमानुष मारहाण करण्यात आली आहे  या प्रकरणी टिटवाळा कल्याण तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात मॅनेजर आणि तीन  महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे  फिर्यादी महिला खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे .


वरप गावात अनेक  अनाधिकृत चाळी बांधणाऱ्या बिल्डरांशी आर्थिक साटेलोटे असलेल्या दलालांचा  वापर या कामी होत असून यात अनेक महिलांचाही सामावेश आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे फावले आहे आर के दुर्गा बिल्डराच्या  ऑफिस मध्ये  मॅनेजर आणि तीन अनोळखी महिलांनी फिर्यादी दिव्या राजेंद्र काळे यांना अमानुष मारहाण केलीआहे. त्याच्या डोक्याला टाके पडले आहेत .  त्यांचा उपचार खाजगी रुग्णालयात सुरू आहेत . चाळीत घर मिळण्यासाठी  दिव्या यांनी आणि पतीने ९० हजार रुपये दिले होते मात्र आर के दुर्गा बिल्डराने पैसे देण्यास नकार देत बडोदा बँकेचा चेक दिला मात्र अक्षरात एक रक्कम आणि आकड्यात एक रक्कम लिहिल्याने  चेक बॉऊन्स झाला त्याचा जाब विचारला असता मॅनेजर आणि तीन अनोळखी महिलांनी मारहाण केली आणि पिटाळून लावले .

या प्रकरणी  टिटवाळा कल्याण तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींवर भा.द.वी. कलम ३२४,३२३, ५०४, ५०६, ३४',  अन्वेय दाखल झाले आहेत दरम्यान बिल्डर आर के शर्मा याना विचारले असता  महिलेचे पैसे देण्यात आले आहेत . मात्र ५० हजार रुपये पेटीयम केले ४० हजार दिले नाहीत अशी माहिती फिर्यादी यांनी दिली आहे .

Post a Comment

Previous Post Next Post