कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या ३२ हजार पार...४०५ नवे रुग्ण तर ७ जणांचा मृत्यू...३२,३९३ एकूण रुग्ण तर ६९१ जणांचा आतापर्यंत मृत्यू...तर २४ तासांत १५१ रुग्णांना डिस्चार्ज



कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांनी ३२ हजारांचा टप्पा ओलांडला असून आज नव्या ४०५ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ७ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत १५१ रुग्णांना डिस्चार्ज देण्या आला आहे.

      आजच्या या ४०५ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची कूण 

संख्या ३२,३९३ झाली आहे. यामध्ये ४२२५ रुग्ण उपचार घेत असून 

२७,४७७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ६९१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 आजच्या ४०५ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व – ३९,  कल्याण प.- ११७डोंबिवली पूर्व १८०डोंबिवली प- ५५मांडा टिटवाळा – मोहना येथील ७ रुग्णांचा समावेश आहे. डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १०२ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून११ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, ११ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय ७ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून७ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post