पालघर जिल्ह्यामधील डहाणु तालुक्यातील तवा ह्या गावातील दुर्घटनाग्रस्त कुटुंबाला खासदार राजेंद्र गावित यांची भेट


 


पालघर : ( भारत पाटारा ) दिनांक ६/९/२०२० संध्याकाळच्या सुमारास वीज अंगावर पडून निलेष हल्या तुमडा ह्या तरुणाचा  मृत्यू झाला ,त्या  युवकांच्या कुटुंबाची पालघरचे  खासदार राजेंद्र गावित  यांनी भेट घेऊन आर्थिक मदत केली .




रविवार दिनांक ६/९/२०२० च्या  संध्याकाळी अचानक विजांचा कडकडाट सुरू झाला यावेळी डहाणु तालुक्यातील  तवा येथे वीज पडून नितेश तुंबडा याचा जागीच मृत्यू झाला होता व अनिल सुधाकर धिंडा हा तरुण  जखमी  झाला होता . खासदार राजेंद्र गावीत यांनी आज मयत नितेश तुंबडाच्या कुटूंबाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन करत त्यांना आर्थिक मदत केली तसच लवकरच शासनाकडून रुपये चारलाख मदत  मिळवून देऊ अस आश्वासन दिलं,तसेच  जखमी अनिल सुधाकर  धिंडा  ह्याना वेदांत हॉस्पिटल मध्ये भेट घेउन विचारपूस केली व उपचार  योग्य प्रकारे व्हावे  म्हणून सुचना दिल्या या वेळी डहाणू प्रांत अशिमा मित्तल,तहसीलदार राहुल सारंग व शिवसेना लोकसभा सहसमन्वयक केदार काळे  उपस्थित होते. 

Post a Comment

Previous Post Next Post