शहापूर/ मनोज कोरडे
शहापुर तालुक्याच्या तहसिलदार निलिमा सूर्यवंशी यांच्या मनमानी व मुजोर कारभारा विरोधात पत्रकार समितिने ११ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री कार्यालयाकडे इमेल द्वारे तक्रार करून तहसीलदार यांची बदली करण्याची मागणी करण्यात आली .सदर तक्रारीची गंभीर दखल न घेतली गेल्यामुळे पत्रकार समिति तर्फे १५ ऑगस्ट २०२० ( स्वातंत्र्यदिनी ) रोजी शहापुर तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण करण्यात आले होते.
भिवंडी उपविभागीय अधिकारी मोहन नळदकर यांनी दिनांक - २० ऑगस्ट २०२० रोजी शासनाचे प्रतिनिधी म्हणून उपोषण ठिकाणी उपोषणकर्तांची प्रत्यक्ष भेट घेत तहसिलदार निलिमा सूर्यवंशी यांच्या विरोधातील पत्रकारांची मागणी शासन दरबारी कळविणे बाबत लेखी पत्र देत आश्वस्त करून उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार पत्रकार समितीच्या वतीने सुरु असलेले बेमुदत साखळी उपोषण २० ऑगस्ट २०२० रोजी तुर्तास स्थगित करण्यात आले होते.
यावेळी पत्रकार समितीच्या वतीने भिवंडी उपविभागीय अधिकारी मोहन नळदकर यांना शहापुर तहसिलदार निलिमा सूर्यवंशी यांच्या बदलीची कार्यवाही पुढील १५ दिवसात न झाल्यास लोकशाही मार्गाने लढा अधिक तीव्र केला जाईल असे एका पत्राद्वारे सुचित केले होते.दरम्यान पञकार समितीने स्थगित केलेल्या साखळी उपोषणाला २० दिवस होऊनही तहसिलदार निलिमा सुर्यवंशी यांची शासनस्तरावरुन आजतागायत बदली न झाल्याने पञकार समिती दिनांक - २१ सप्टेंबर रोजी शहापुर तहसिलदार कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन पत्र पत्रकार समितीच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, पालकमंत्री, कोकण आयुक्त व जिल्हाधिकारी यांना मेल द्वारे देण्यात आले आहे.
Post a Comment