कल्याण प्रतिनिधी
डोंबिवली
येथील राष्ट्रीय शिक्षण संस्थेतील शिक्षकांसाठी शिक्षक दिनानिमित्त उब्दोधन वर्ग नुकताच ऑनलाइन संपन्न झाला.
कार्यक्रमाचे स्वागत भाग्यश्री
दातार यांनी गीत सादर करून केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक
डॉ.कुलकर्णी यांनी केल्यानंतर
देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव
मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी संस्था सदस्य डॉ. शरद धर्माधिकारी
यांनी शिक्षकांना मोलाचे मार्गदर्शन करीत असताना
शिक्षकांनी विध्यार्थ्यांचा मित्र बनून समुपदेशन करावे. अध्ययन व अध्यापनात
अद्ययावतता असावी. व्यावसायिक गुणाबरोब
व्यावसायिकनिष्ठा व संशोधन वृत्ती असावी
असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख रात्र महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनुजा
पळसुले देसाई व प्रा. डॉ. विजय मोरे यांनी
काम पाहिले .सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
सुनील पांचाळ यांनी केले तर आभार संस्थेचे सहकार्यवाह प्रमोद उंटवाले
यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता मृणाल
केळकर यांनी गायलेल्या वंदेमातरमने झाली.
Post a Comment