डोंबिवली ( शंकर जाधव ) - कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना नागरिकांच्या आरोग्यासाठी भाजपा प्रभाग क्र. ५४ ठाकुरवाडी जुनी डोंबिवली येथे आमदर रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा डोंबिवली पश्चिम अध्यक्ष कृष्णा बाळाराम पाटील यांनी पुढाकार घेऊन जंतुनाशक फवारणी केली. श्री समर्थ कृपा,दत्त दर्शन बंगला, पितृश्राया, सुंदराई बिल्डिंग,बायजाबाई स्मृति,एकनाथ स्मृति,निळकंठ पॅलेस,तुकाराम कृपा, तुकाराम पॅलेस,सदु स्मृती,गोविंद गोपाळ स्मृति, ज्ञानेश्वर ठाकूर स्मृति,कृष्ण कूंज बिल्डिंग,रोहिदास पॅलेस,हरीभाऊ पॅलेस,रूपेश आर्केड,तुकाराम निवास, एकनाथ पाटील बिल्डिंग,विपुल स्मृति बिल्डिंग,पुंडलिक स्मृति,सोनुबाई सदन १,सोनुबाई सदन २,बाबासाई कृपा,कृष्णा निवास, गुरूदत्त कृपा, बालाजी पॅलेस, भिम आश्रय,पु.भा.भावे. शाळा या परिसरामध्ये कृष्णा पाटील यांनी स्वतः च्या देखरेखीखाली कर्मचाऱ्यांकडून जंतुनाशक फवारणी करून घेतली.पाटील यांनी जुनी डोंबिवली येथे आरोग्य शिबीरही आयोजित केले होते.पाटील यांच्या या समाजकार्याचे नागरिकच नव्हे तर खुद्द आमदार रवींद्र चव्हाण यांनी कौतुक केले.
भाजपच्या वतीने ठाकूरवाडी जुनी डोंबिवलीत जंतुनाशक फवारणी ..
mumbaidateline24
1
Good job 👍
ReplyDeletePost a Comment