अखेर पर्यटकांमुळे भंडारदऱ्यात कोरोना दाखल, स्थानिक आदिवासी नागरिंकामध्ये घबराटीचे वातावरण .

         

प्रतिनिधी .वैभव बुळे सह ,डॉली डगळे ,भंडारदरा 
भंडारदरा :  अकोले तालुक्यातील भंडारदरा पर्यटन स्थळ सध्या खुपच चर्चेत आले आहे गेल्या मागील काही दिवसांपासून स्थानिक ग्रामपंचायत च्या वतीने पर्यटकांना भंडारदरा धरण परिसरात बंदी घालण्यात आली होती व प्रशासनाला देखील सावधानतेचा पूर्व कल्पना देऊन भंडारदरा ग्रामपंचायत चे सरपंच व ग्रामस्थ यांनी वेळोवेळी निवेदन दिले होते तरी सुद्धा या भागात मुंबई पुणे नाशिक या रेड झोनमधील पर्यटक चोरी छुपे   येत आसतात ,स्थानिक नागरिक रहिवासी व विद्यार्थी घबराटीमुळे घरात व शेतात जाऊन बसत आहेत .भंडारदरा पाटबंधारे कर्मचारी वसाहतीत असलेले हाटेल समाधान या ठिकाणी रात्री चाळीस पर्यटकांच्या उपस्थितीच चोरी छुपे वाढदिवसाची पार्टी साजरी करण्यात आली .मात्र सकाळी हॉटेल मालकाचा मुलगा व घरातील इतर एक महिला व सदस्य यांना कोरोनाचे लक्षण जाणवू लागले व त्यांनी त्वरीत सरकारी 108 ची रूग्णवाहिका बोलावून अकोले ग्रामीण रूग्णालयात हलविले .तर तेथील आजूबाजूला असणारे एकूण चाळीस कुंटुब तालुका प्रशासनाने कोरोनटाईन केले आहेत तसेच संपूर्ण पाटबंधारे वसाहत प्रतिबंधक उपाययोजना म्हणून सील बंद करण्यात आली आहे अशी माहिती अकोले तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतोष चोळगे यांनी दिली आहे .तसेच या भागात गेल्या मागील आठ दिवसांपासून भंडारदरा ग्रामपंचायत ने या हॉटेल समाधानला नोटीस देखील बजावली होती ,स्थानिक नागरिकांनी प्रशासना विरोधात तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त केली.या हॉटेलमध्ये मागील चार दिवसांपासून पर्यटक रात्री गुपचूप येऊन जेऊन जातात अशी माहिती स्थानिक नागरिकांनी पत्रकारांना नाव न सांगण्याचा अटीवर दिली .पोलीस व महसूल तसेच पाटबंधारे प्रशासनाच्या दुर्लक्ष मुळे भंडारदरा मध्ये कोरोना चा शिरकाव झाला आहे .सध्या स्थानिक भंडारदरा ग्रामपंचायत सरपंच पांडुरंग खाडे व ग्रामस्थ मा.पर्यटन विकास व मुख्यमंत्री यांच्या कडे मागणी करणार आहेत सदरील भंडारदरा धरण परिसर पर्यटकांसाठी बंद करण्याचा यावे जोपर्यंत कोरोना संसर्ग कमी होत नाही .प्रशासनाने वेळीच दखल नाही घेतली तर स्थानिक ग्रामस्थ सरकार विरोधात आंदोलन करण्याचा तयारीत आहे .

1 Comments

  1. शेंडी गावातील युवकांचा असल्या कोणत्याही बातमीशी संबंध नसून कोणी हि समधान हॉटेल येथे जेवायला गेले नाहीत.व इतर कुटल्या ही प्रकारची पार्टी अाम्ही समाधन हॉटेल मधे केलेली नाही.

    तसेच झाल्या प्रकारणाची युवकांची नाहक बदनामी केली गेली
    आणी विनाकारण त्रास सहन करावा लागला. सदर घटनेमुळे गावात घबराटीचे वातावरण पसरलेले आहे. तसेच सदर घटनेशी कुठलाही सबंध नसताना युवक कॉरनटाइन आहेत आणी दर रोज प्राथमिक आरोग्य केंद्रात जावुन तपासनी करत आहेत.
    *तरी पत्रकार बांधवाना विनंती आहे बातमी देताना संपुर्ण प्रकारनाची चौकशी करुनच बातमी द्यावी.*
    *ग्रामस्थ शेंडी*

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post