MD24 : रोशन उबाळे / कल्याण –
कल्याण : लग्नाला नकार दिल्यामुळे तरुणीला मारहाण करणाऱ्या प्रियकराला कल्याण पोलिसांनी अवघ्या दोन तासात बेड्या ठोकल्या तुझ्यासाठी बायको सोडली आणि तुझी नकार घंटा सुरू असल्याने रागाने घडला। होता प्रकार महात्मा फुले चौक पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवलल्या आहेत .
तूझ्यासाठी बायकोला सोडले आहे. तू आता लग्नाला का नकार देते?, असे म्हणत तरुणीला मारहाण करणाऱ्या युवकाला कल्याण पोलिसानी दोन तासांमध्ये बेड्या ठोकल्या आहेत. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी ही कारवाई केलीअसून तरुणीला मारहाण करणाऱ्या प्रियकराचे नाव अजित कनोजिया असे आहे.
कल्याण पूर्वेतील कचोरे परिसरात राहणारी एक तरुणी ही कल्याण पश्चिमेतील सर्योदय मॉलमध्ये कामाला आहे. ही तरुणी काम आटोपून मॉलच्या इमारतीच्या खाली आली असता एका तरुणाने तिच्याशी हुज्जत घातली. त्यानंतर तिला भर रस्त्यात मारहाण सुरु केली. काही नागरीकांनी या तरुणाला पकडले. मात्र तो पळून गेला. तरुणीला मारहाण करणाऱ्या युवकाचे नाव अजित कनोजिया असून काही वर्षापासून त्याचे संबंधित तरुणीसोबत प्रेमसंबंध होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
अजित हा विवाहित आहे. विवाहित असताना या तरुणीसोबत प्रेमसंबंध सुरु होते. दहा दिवसापूर्वी त्याने या प्रेयसीसाठी पत्नीला सोडले होते. पत्नीला सोडल्यानंतर तो तरुणीला वारंवार लग्नासाठी गळ घालत होता. तरुणीने त्याला लग्नासाठी नकार दिला होता. शुक्रवारी सांयकाळी लग्नाच्या विषयावरुन त्यांच्यात वाद झाला. या वादातून त्याने तिला मारहाण केली आहे दरम्यान पोलिसांनी युवकांवर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे .
त्याने तिच्यासाठी बायकोला सोडले आणि तिने…..
mumbaidateline24
0
Post a Comment