विक्रमगड प्रतिनिधी/ भारत पाटारा
विक्रमगड शहरात राहणाऱ्या
वंदना विलास वाडेकर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून उद्योग क्षेत्रामध्ये चांगली
कामगिरी बजावली आहे.त्या कामगिरीची दखल येथील सिद्धदत्त न्यास संस्थेने घेतली असून
त्यांनी वाडेकर यांचा विशेष उल्लेखनीय सेवाकार्य केल्याबद्दल सन्मान करून सत्कार
करण्यात आला.यावेळी त्यांना संस्थेकडून विक्रमगड च्या नगराध्यक्षा प्रतिभा पडवले
यांचे शुभ हस्ते शाल, श्रीफळ व पुरस्कार प्रमाणपत्र अदा करण्यात आले.वाडेकर ह्या गेल्या
पन्नास वर्षांपासून उद्योग क्षेत्रामध्ये कार्यरत असून त्यांनी प्रथम आपल्या
घरामध्येच छोटीशी घरगुती खानावळ चालवत एक डबा आठ रुपये याप्रमाणे सुरुवात केली ती
आज एका डब्याची किंमत सत्तर रुपये झाली आहे.विक्रमगड शहरामध्ये प्रथमच
घरगुती खानावळ चालू केली व बाहेर गावाहून येणाऱ्या कर्मचारी व अधिकारी यांची
जेवणाची कधीही गैरसोय होऊ दिली नाही.आज हळूहळू त्यांचा हा व्यवसाय वृंधिगत होत
गेला व याची दखल आज पर्यंत कुणीही घेतली नव्हती ती सिद्धदत्त न्यास यांनी
घेतली व त्यांचा यथोचित सन्मान केला.यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की,माझे कष्टाचे आज चीज
झाल्याचे समाधान वाटले व त्यांनी या सिद्धदत्त न्यास संस्थेचे आभार मानले.
Post a Comment