उटावली येथील शेतकऱ्यांना कडधान्य पिकांच्या हरभरा बियाणाचे वाटप करण्याचां कार्यक्रम संपन्न झाला


 



विक्रमगड प्रतिनिधी/ भारत पाटारा

         विक्रमगड तालुक्यातील ग्रामपंचायत उटावली येथे राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना अंतर्गत कडधान्य विकास कार्यक्रम मार्फत टोकन पद्धतीने हरभरा लागवडीसाठी राजविजय- 202 या वाणाचे बियाणे शेतकऱ्यांना वाटप करण्याचां कार्यक्रम उटावली येथे संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य अशोक ढोणे, उटावली सरपंच सतीश गायकवाड, मंडळ कृषी अधिकारी ,कृषी सहायक शेतकरी उपस्थित होते.

     उपस्थित शेतकऱ्यांशी चर्चा करताना नवीन तंत्रज्ञान वापरून शेती करावी तसेच जिल्हा कृषी समिती सदस्य म्हणून शेतकऱ्यांच्यां अडचणी जाणून घेवून सर्वोतपरी मदत करणार असल्याचे यावेळी बोलताना संदेश ढोणे यांनी सांगितले.

       यादरम्यान नैसर्गिक वस्तू निर्मिती बांबू हस्तकला महिला समूह उटावली या नावाने उटावली गावातील होतकरू महिलांनी बांबूपासून विविध वस्तूंची निर्मिती करण्याचां उपक्रम असलेल्या सेंटर ला भेट देवून तयार केलेल्या वस्तूंचे मार्केटिंग तसेच या पुढील काळात मशनरी ची उपलब्धता आणि शासनाकडून लागणारी सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे उपक्रम कर्त्यांशी संदेश ढोणे यांनी संवाद साधला.

Post a Comment

Previous Post Next Post