विक्रमगड मधील दहावी बारावी परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचां गुणगौरव समारंभ संपन्न



विक्रमगड प्रतिनिधी/ भारत पाटारा

दिनांक 31ऑक्टोबर 2020रोजी सकाळी अकरा वाजता विक्रमगड हायस्कूल विक्रमगड प्रशाळे मध्ये विक्रमगड परिसरातील विविध शाळांमध्ये दहावी बारावी परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचां गुणगौरव समारंभ पार पडला.सदर समारंभाला विक्रमगड हायस्कूल शालेय समितीचे सदस्य पुंडलिक भानुशाली हे प्रमुख पाहुणे तर शालेय समितीचे सदस्य महेश आळशी हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.या कार्यक्रमामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचां गुणगौरव व सत्कार करण्यात आला तसेच त्यांना प्रमुख पाहुण्यांमार्फत बक्षीस वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रमुख  पाहुण्यांकडून पुढील शैक्षणिक वाटचालीस मार्गदर्शन व शुभेच्छा देण्यात आल्या तसेच शाळेचे मुख्याध्यापक सुरेश पाटील सर ,धनगर सर , खुताडे सर तसेच इतर शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

       कोरोना परिस्थितीमुळे सोशल डीस्टंसिंग चे सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत कमीत कमी उपस्थित या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्वांचे स्वागत व आभार मानून कार्यक्रम पार पडला.

Post a Comment

Previous Post Next Post