मोबाईल नेटवर्क विना असलेले गाव

 


MD 24 - डहाणू  (प्रकाश महाला )

 बातमी ची हेडलाईन वाचून आपल्याला थोड नवल  वाटल असेल ना ...पण होय हे खर आहे ..पालघर जिल्ह्यामध्ये  डहाणू तालक्यातील असे एक  ग्रामीण भागातील गाव आहे .जिथे कित्येक वर्षापासून मोबाईल ला नेटवर्क मिळत नाही .विशेष मात्र या भागात दोन मोबाईल टॉवर असून ते बंद आहेत .हे विना नेटवर्क असलेले गाव म्हणजे  सायवन... . सायवन गाव हे ग्रामीण आदिवासी भागातील एक मोठी  बाजार पेठ मानले जाते.या गावाला दिवशी , दाभाडी , किनव्हली , गडचिंचले , सुकट आंबा , चळणी, रायपुर , आष्टे आदी गावातील नागरिकासाठी सायवन ही  बाजार पेठ आहे . या गावात  ८ मोठे सरकारी कार्यालय आहेत (१) ग्रामपंचायत कार्यालय (२) तलाठी कार्यालय (३) वन कार्यालय व तशीच  बँक ऑफ महाराष्ट्र (५) ठाणे जिल्हा बँक ( ६) पोलीस चौकी (७) सरकारी दवाखना (८) शासकीय आश्रम  शाळा असून तिकडे जवळ पास कुठे ही नेटवर्क  नसल्यामुळे तिथल्या प्रत्येक नागरिकाला नेटवर्क विना  मनस्ताप सहन करावा लागतो  . जर कुणाला फोन करायचा असेल तर त्यांना तीन ते चार किलोमीटर लांब जावून फोन करावा लागतो .सद्यस्थिती  विद्यार्थ्यांचे या कोरोना काळामध्ये ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे, अभ्यासामध्ये मोठे नुकसान होत असल्यामुळे विद्यार्थी,सरकारी कर्मचारी व जनता नाराज आहे .हे मोबाईल टॉवर चालू करण्याबाबत अनेक वेळा प्रशासनाला विनंती अर्ज सादर केले आहेत , परंतु प्रशासनाकडून कोणतीही मोबाईल टॉवर चालू करण्याबाबत कार्यवाही करण्यात आली नाही .त्यामुळे हे टॉवर लवकरात लवकर चालू करावेत अशी मागणी जनमानसातून होत आहे .

Post a Comment

Previous Post Next Post