डोंबिवली ( शंकर जाधव ) कलाक्षेत्रातील प्रत्येक घटकाला न्याय व
हक्क मिळवून देण्याच्या उद्देशाने लोकस्वराज्य फिल्म अॅड टेलीव्हिजन ट्रेड
युनियनचे संघटनेची स्थापन करण्यात आली.युनियनचे संस्थापक अभिजित खरे, राष्ट्रीय
अध्यक्ष प्रशांत खानविलकर व राष्ट्रीय कमिटी सदस्य व महाराष्ट्र राज्य कमिटी तसेच
ठाणे जिल्हा अध्यक्ष महेश दवंडे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण- डोंबिवली ( तालुका )
पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. डोंबिवली पश्चिमेकडील कान्होजी जेधे ( भागशाळा
) मैदानाजवळील सत्य सभागृहात संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या
हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
लोकस्वराज्य फिल्म अॅड टेलीव्हिजन ट्रेड युनियनचे संघटनेच्या
कल्याण- डोंबिवली ( तालुका ) अध्यक्षपदी विशाल मोहिते,उपाध्यक्षपदी
विकास थोरात,कार्याध्यक्षपदी भगवान पवार, उपकार्याध्यक्षपदी सतीश सुर्वे, शंकर जाधव,सचिवपदी
स्वप्निल जोशी, उपसचिवपदी अर्जुन ठोमाडे,प्रथमेश माळी, संपर्क
प्रमुखपदी संजय प्रजापती,उपसंपर्कपदी योगेश मोरे,कुणाल चौधरी,चैताली जावकर,श्वेता कांबळे,तक्रार निवारण
प्रमुख मिलिंद सकपाळ,उपतक्रार निवारण प्रमुख विक्रांत नकाशे आणि तुषार गवरे यांना
उपस्थित वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी विनायक कांगणे, ठाणे जिल्हा
अध्यक्ष तथा प्रसिद्ध निवेदक महेश दवंडे, फोर इडियट मराठी चित्रपटातील अभिनेता
स्वप्नील जोशी, संघटनेचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख तथा हस्य सम्राट
जॉनी रावत,उपसंपर्क प्रमुख लक्ष्मण गोळे,रात्रीस खेळ चाले
फेम नाथा भाऊ, ठाणे जिल्हा उपसचिव प्रवीण गायकवाड, आदि मान्यवर
उपस्थित होते.यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांसमोर आपला परिचय करून
दिला. तर मान्यवरांनी आपल्या भाषणात संघटनेचा उद्देश स्पष्ट केले.प्रसिद्ध जादुगार
यांनी उपस्थितांचे अभिजित यांनी जादूचे प्रयोग तर हास्य सम्राटजॉनी रावत यांनी
त्यांचे गाजलेले काही विनोद ऐकवून उपस्थितांचे मनोरंजन केले.लॉकडाऊन मध्ये बंद
असलेले मोरे डान्स अकादमी पुन्हा सुरु झाल्याचे जाहीर करण्यात आले.
Post a Comment