वाडा तालुक्यातील अनेक ठिकाणी महात्मा रावणाचे पूजन करून केला अदिवासी बांधवांनी दसरा सण साजरा

 

वाडा –परळी  / प्रतिनिधी :- प्रकाश भला

 


वाडा तालुक्यातील अनेक ठिकाणी महात्मा रावणाचे पूजन करून केला अदिवासी बांधवांनी दसरा सण साजरा केला महात्मा रावणाला आदिवासी बांधव युगानुयुगे पूजत अली आहेत . त्याच प्रमाणे रावणाच्या प्रतीमेला दहन करण्याच्या परंपरेला आदिवासी बांधवांनी विरोध केला . विविध आदिवासी संघटनांनी तहसीलदार , कार्यालयाला निवेदनं दिली होती . त्यामुळे या वर्षी महात्मा रावणाची प्रतिमा दहन करण्यात आली नाही . याबद्दल  आदिवासी बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे . इतर देव देवता प्रमाणेच आम्हाला रावण देखील तितकाच पूजनीय आहे असे मत यावेळी आदिवासी बांधवानी व्यक्त केले.  वाडा तालुक्यातील ओगदा गावामध्ये ही महात्मा रावणाचे पूजन पारंपारिक पद्धतीने करण्यात आले .

Post a Comment

Previous Post Next Post