आदिवासी धर्मकोड कॉलम ७ जाहीर करण्याची अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची मागणी ...निवासी जिल्हाधिकारी श्रीमती.डॉ.पद्मश्री बैनाडे रायगड यांना निवेदन

 


MD 24 कर्जत – नितीन पारधी

दि 22/10/2020 रोजी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे कोकण प्रदेश अध्यक्ष दत्तात्रेय सुपे व रायगड जिल्हा  अध्यक्ष रामभाऊ भस्मा यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या 2021 च्या जनगणनेत आदिवासी धर्मकोड 7 जाहीर करावा यासाठी रायगड निवासी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले तसेच 6 जुलै 2017 च्या सुप्रीम कोर्टाची आमल बजावणी करणे,धनगर समाजाला आदिवासी समाजाचे आरक्षण देण्यात येऊ नये,परतीच्या पावसात शेती नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी दि. 22.10.2020 रोजी देशपातळीवर प्रत्येक राज्यात काम करणाऱ्या अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने महामहिम राष्ट्रपती यांना संपूर्ण देशातून प्रत्येक राज्यातील जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आदिवासी हिंदू नसून तरीही मनुवादी विचार सरणीच्या लोकांकडून आदिवासींना हिंदू बनविण्याचा प्रयत्न करत आहेत आणि जबरस्तीने हिंदू बनवत आहेत वनवासी बनवत आहेत आदिवासी मूलनिवासी आहे या देशाचा खरा मालक आहे पण या धर्तीचा खरा भूमिपुत्र आहे तरीही मनुवादी विचार सरणी कडून आदिवासींचं अस्तित्व संपविण्याचं कटकारस्थान चालू आहे हे हाणून पाडण्यासाठी आदिवासी धर्म कोड कॉलम जाहीर करावा अन्यथा दिल्ली येथे जंतर मंतर वर तीव्र आंदोलन करण्यात येईल यासाठी निवेदन देण्यात आले त्याप्रसंगी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष कांता पादिर साहेब,पनवेल तालुका अध्यक्ष संजय चौधरी, व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post