माजी नगरसेवक विश्वदीप पवार यांच्या कार्यालयात हळदीकुंकू समारंभ




डोंबिवली ( शंकर जाधव) : संक्रात म्हंटल कि तिळगुळ आणि महिलांच्या हळदी  कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. तिळगुळ घ्या आणि वर्षभर न भांडता गोड बोला असा प्रेमळ संदेश यामाध्यमातून दिला जातो. असाच प्रेमळ संदेश देण्यासाठी डोंबिवली पूर्वेकडील  प्रभाग क्र.६९ शिवमार्केट येथील नगरसेवक विश्वदीप पवार यांच्या सी.के.पी. सभागृहाजवळील रेणू अपार्टमेंट मधील जनसंपर्क कार्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी समाजसेविका श्रद्धा पवार, भाजप पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी महिलांना तिळगुळ आणि वाण देण्यात आले.

 

Post a Comment

Previous Post Next Post