पालघर (निलेश कासट ):-
डिजिटल इंडिया चा नारा भागात पोहचवत , ग्रामीण भागातील बॅंकिंग व्यवस्था मजबूत व्हावी , यासाठी प्रत्येक राष्ट्रीयकृत बॅंका ग्रामीण भागात आपल्या ग्राहकांसाठी लहान ग्राहक सेवा केंद्रच्या शाखा उघडत आहेत.तलासरी तालुक्यातील कोचाई (पाटीलपाडा ) येथे बँक ऑफ बडोदा या बॅंकेचे नवीन ग्राहक सेवा केंद्र दि .१५ जानेवारी रोजी सुरू करण्यात आले आहे.आताच बडोदा बॅंक , देना बॅंक व विजया बॅंक या तिन्ही बॅंकेचे एकत्रीकरण करत एकच बॅंक ऑफ बडोदा मध्ये वीलगीकरण करण्यात आहे.
त्यामुळे तलासरी तालुक्यात अधिकाधिक बॅंकेचे सभासद व्हावे या उद्देशाने तलासरी तालुक्यातील आमगाव , बोरमाळ, कोचाई , वरवाडा ,सावरोली व आजूबाजूच्या गावातील नागरिकांसाठी कोचाई(पाटील पाडा ) येथे बॅंक ऑफ बडोदा चे ग्राहक सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे.याठिकाणी बचत खाते ,प्रधानमंत्री जनधन खाते , पैसे भरणे , पैसे काढणे व इतर बॅंकिंग सुविधा येथून ग्राहकांना मिळणार आहेत .त्याचप्रमाणे जेष्ठ नागरिकांना सरकारच्या पेन्शन सुविधांचाही लाभ घेता येणार आहे. या उध्दघाटन कार्यक्रमावेळी बॅंक ऑफ बडोदा शाखा तलासरी चे शाखा अधिकारी जितेंद्र चौहान , अनिल झीरवा , संतोष दोडीया , अरविंद वाढिया , महेश वाढीया, नैनेश वाढीया, आदी सह बडोदा ग्राहक सेवा केंद्र कोचाई च्या जसवंती कोल्हा उपस्थित होत्या .
Post a Comment