रायगड : नरेश हिरवे
महामार्गावरील वाहणांचे वाढते प्रमाण पाहता घडणारे अपघात व वाढणारे मृत्यूचे प्रमाण ही संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. हे प्रमाण कमी करण्याकरिता १ मार्च २०२१ रोजीपासून महाराष्ट्र राज्याचे महामार्ग पोलिस विभाग प्रमुख डॉ. भूषण कुमार उपाध्याय अपर पोलिस महासंचालक म.रा. मुंबई यांचे संकल्पनेतून हायवे मृत्युंजय दुत योजना राज्यात राबविण्यात येणार आहे.
याकरिता गोल्डन अवर (GOLDEN HOUR ) मध्ये अपघाग्रस्तांना व्यवस्थितरीत्या रुग्णालयात नेता यावे व त्यांना योग्य उपचार त्वरित मिळण्यासाठी राज्य महामार्ग पोलिस विभागातर्फे हायवे मृत्युंजय दुत ही योजना राज्यातील महामार्गावर राबवण्यात येणार असून या योजनेची रूपरेषा खालील प्रमाणे.
१. महामार्ग अखत्यारीतील महत्त्वाचे राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील सर्व मॉल, पेट्रोलपंप, ढाबा कींवा हॉटेलमध्ये काम करणारे कर्मचारी तसेच महामार्गा लगतच्या गावातील चार ते पाच लोकांचा ग्रुप तयार करून त्यांना मृत्युंजय देवदूत नावाने संबोधण्यात येणार आहे.
२. या देवदूत व्यक्तींना अपघातग्रस्त व्यक्तीस कसे हाताळावे कींवा कसे उचलावे याबाबतचे प्रथमोपचार प्रशिक्षण देऊन त्यांच्या प्रत्येक ग्रुपला ऐक स्ट्रेचर व प्राथमिक उपचाराचे साहित्य देण्यात येणार आहे.
३. महामार्ग अखत्यारीतील राष्ट्रीय व राज्य महामार्गानजीकच्या हॉस्पिटल्स ची नावे,पत्ते व संपर्क क्रमांक अदयावत करण्यात येणार आहेत.
४. रुग्णवाहिका १०८ हा दूरध्वनी क्रमांक आहे. याबाबत माहिती देवदूत यांना देऊन इतर खाजगी व इतर रुग्णालयात सलग्न असणाऱ्या रुग्णवाहिकेची माहितीसुद्धा देण्यात येणार आहे.
५. हायवे मृत्युंजय दुत यांना अपघात प्रसंगी मदत करताना कोणतीही अडचण येऊ नये याकरिता त्यांना महामार्ग सुरक्षा पथकांकडून ओळखपत्र देण्यात येणार आहेत.
६. देवदूतांना प्रोत्साहन मिळाले याकरिता रस्थे वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने घोषित केलेले (गूड समरीटन अवॉर्ड) चांगले काम केलेल्या देवदुताना मिळण्यासाठी शिफारस करण्यात येणार आहे.
७. आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांनी जाहीर केलेली स्व. बाळासाहेब ठाकरे रस्थे अपघात विमा योजना या योजनेची सविस्तर माहिती सबंधित नातेवाईक आणि संबंधितांना देण्यात येणार आहे.
Post a Comment