विक्रमगड तालुक्यात रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

                       


  पालघर(निलेश कासट -चीफ ब्यूरो):-

 रोजगार हमी योजना ही ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची योजना असून मागेल त्याला काम , अशी योजना असून रोजगार हमी च्या कामामुळे ग्रामीण भागातील रोजगारासाठी होणार स्थलांतर थांबते .या योजनेत अंतर्गत गावातील रस्ते , विहिरी बांधणे , शेततळी , बांध बांधणे इत्यादी कामे गावातील लोकांना रोजगार मिळतो . या साठी कुटुंबातील प्रत्येकाचे जॉब कार्ड (रोजगार पत्रक )काढले असून त्या कामावर देखरेख करणे , मजुरांनाची हजेरी भरणे इत्यादी कामासाठी   प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एका रोजगार सेवकाची शासनाकडून नेमणूक केली जाते .मात्र विक्रमगड तालुक्यातील काही ग्रामपंचायती मध्ये जे मजूर कामावर येत नाहीत , काही महिलांची  लग्न करून बाहेर गावी गेल्या आहेत , ग्रामपंचायत सदस्य , ग्रामपंचायतीचे आजी -माजी सदस्य , उपसरपंच , सरपंच यांची नावे रोजगार हमी च्या योजनेच्या कामाला दाखवून त्यांच्या नावावरील पैसे संबधित व्यक्तीला तसेच रोजगार सेवक व ग्रामसेवक यांच्या भागीदारी करून घेतले जातात .म्हणजे जी व्यक्ती रोजगार हमी योजनेच्या चालू असलेल्या कामावर न जाता ग्रामसेवक व रोजगार सेवक यांच्या सेवेने घरी बसुन मलई खाण्याचे काम करत असल्याच्या तक्रारी सामाजिक संस्था , सामाजिक कार्यकर्ते करत आहेत .अश्या भ्रष्ट रोजगार सेवक , ग्रामसेवक यांच्या शासनाची फसवणूक केल्याच्या तक्रारी करून त्यांच्या फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहेत .



1 Comments

  1. विक्रमगड तालुक्यातील कुरझे ग्रामपंचायत अंतर्गत आम्ही पण रोजगार हमी च्या कामावर होतो परंतु आम्ही 4 मस्टर चे काम करून ही आम्हाला अजून पैसे मिळाले नाहीत रोजगार हमी च्या कायद्याच्या नुसार 8 दिवसात पैसे जमा होणे अनिवार्य असताना अजून पैसे मिळालेले नाहीत त्यामुळे विलंब शुल्क पण लागू पडते तर हे पैसे लवकर मिळवून द्यावे

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post