मनसेच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा


डोंबिवली ( शंकर जाधव ) मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. डोंबिवली पश्चिमेकडील भागशाळा मैदान, द्वारका चौक, आनंदनगर यांसह मुख्य भागात मनसेच्या महिला पदाधिकारी डोंबिवलीकर महिलांच्या स्वागतासाठी उभ्या होत्या. येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना गुलाबाचे फुल व कॅटबरी वाटत महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील आणि मनसे महिला शहराध्यक्षा मंदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी मनसे महिला शहर संघटक सुमेधा थत्ते, उपशहर निलिमा भोईर,श्रद्धा किरवे, वर्षा शाह, वनिता पालांडे, श्रद्धा शिगवण, शर्मिला लोंढे,शालिनी भोईर, व इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. डोंबिवलीकर महिलांनीसुद्धा त्यांचे कौतुक करीत त्यांनाही महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post