डहाणू ( पालघर चीफ
ब्यूरो-निलेश कासट
)
डहाणू आदिवासी विकास प्रकल्पाला अंतर्गत येणाऱ्या अनुदानीत आश्रम
शाळा रानशेत येथे चिंचारे
येथील मोनाली जाण्या वावरे ही विद्यार्थ्यानी १२ वी ला शिक्षण घेत
होती .मात्र या विद्यार्थिनी चा १४ जानेवारी रोजी आकस्मित मृत्यू झाला
होता.आदिवासी विकास प्रकल्प डहाणू यांच्या कडून शाळेच्या बाबतीत नेहमी कर्तव्य
दक्ष असलेले, विद्यार्थी व पालक यांच्या मदतीला नेहमी पुढे असणारे प्रभारी शिक्षण
विस्तार अधिकारी श्री.सिधेस्वर गवळी सर व शिक्षण विस्तार अधिकारी केशव मोहिते
सर यांनी आश्रमशाळेतील अकस्मात मयत झालेल्या मुलीच्या पालकांना तात्काळ एक लाख
सानुग्रह अनुदान मिळवून दिले.आलेले सानुग्रह अनुदान दुस-या मुलांच्या शिक्षणासाठी
योग्य पद्धतीने खर्च करा असे प्रकल्प अधिकारी व सहाय्यक जिल्हाधिकारी असिमा
मित्तल मॅडम यांनी पालकांना सांगितले.
Post a Comment