( संदीप शेंडगे )
टिटवाळा : टिटवाळा पुर्व भागातील हरी ओम व्हॅली जवळील आर के नगर परीसरातील विजपुरवठा खंडित होऊन २७ तास उलटून गेले आहेत. अद्यापही वीजपुरवठ सुरळीत न झाल्याने उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. महावितरणकडुन ट्रान्सफार्मर बिघडल्याचे कारण सांगितले जात आहे. मात्र अजून पर्यंत कोणीही कर्मचारी अथवा अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही तसेच ट्रांसफार्मर उपलब्ध होऊनही का बसविला जात नाही असा सवाल नागरिकांनी यावेळी उपस्थित केला.
मांडा टिटवाळा आणि महावितरणाचा नेहमीचा सावळा गोंधळ हे आता समीकरणच झाल्याचे वारंवार सिद्ध होताना दिसत आहे. महावितरण कार्यालाच्या भोंगळ कारभाराचा मनस्ताप येथील अनेक वीज ग्राहकांना भोगावा लागत असून विजेचा झटका लागून नागरीकांचा ,प्राण्यांचा तसेच महावितरणाच्या कर्मचा-र्यांचाही जीव गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्याचप्रमाणे वीज बिल वेळेवर न येणे, वीज बिल जास्त येणे , रीडिंग बाबतचा गोंधळ,नादुरुस्त मीटर बदलण्यात दिरंगाई करणे, वारंवार विद्युत प्रवाह खंडित होणे , कमकुवत झालेले विद्युत पोल तातडीने बदली करणे यांसारख्या समस्यांसाठी अनेकवेळा आंदोलने आणि मोर्चे झाले मात्र महावितरण कंपनीत काही सुधारणा होण्याची लक्षणे दिसत नाहीत .
आज वीजपुरवठा एकदा खंडित झाल्यानंतर असंख्य लोकांनी याबाबत कार्यालयास विचारणा केली त्यावेळी बदलापूर वरुन ट्रान्सफार्मर मागवावा लागतो हेच सांगत आहेत मग नक्की हा बदलापूर कोणते जे टिटवाळ्याच्या बाजुला आहे ते कि भारताच्या दुसऱ्या टोकाला अजून एखादे बदलापूर उदयाला आले आहे . असा संतप्त सवाल येथील समाजिक कार्यकर्ते विजय देशेकर यांनी विचारला आहे. वारंवार येणाऱ्या या ह्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायलाच हवी आणि अकार्यक्षम असणाऱ्या कार्यकारी अभियंता निलेश महाजन उपकार्यकारी अभियंता धूर्वे यांची त्वरित बदली करुन एक चांगला कार्यक्षम व वीजग्राहकांच्या सेवेला कार्यतत्पर अधिकारी देणे आवश्यक आहे. अन्यथा महावितरणचा टिटवाळ्याचा कारभार असाच गलथान होत राहिल आणि नागरीकांच्या मनात महावितरण बद्दल अजुन रोष निर्माण होइल टिटवाळ्याची गेले २७ तास ट्रांसफार्मर खराब झाल्यांर आरके नगरची लाईट गेली आहे आणि आता ट्रान्सफार्मर आला आहे पण तो गाडीतुन खाली उतरवायला क्रेन महावितरण कंपनीला क्रेन सापडत नाही असे उत्तर नागरीकांना मिळत असेल तर ही महावितरण कंपनी काय कामाची आहे असा रोखठोक सवाल विजय देशकर यांनी उपस्थित केला आहे. टिटवाळा तील महावितरणच्या गलथान कारभाराबाबतचे तक्रार निवेदन यांनी वरिष्ठ अधिकारी आणि उर्जामंत्री यांनाही पाठवले आहे. त्यामुळे टिटवाळातील गेंड्याची कातडी असलेल्या महावितरणचे अधिकारी व कर्मचारी वीज पुरवठा कधीपर्यंत सुरळीत करते याकडे टिटवाळा येथील शेकडो बीज ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
Post a Comment