तीर्थक्षेत्र श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर महाशिवरात्री उत्सवासाठी बंद

डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवलीतील शिवमंदिरात दरवर्षी मोठया उत्साहात महाशिवरात्री उत्सव साजरा केला जातो. पण यंदा कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सर्व मंदिरे भक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली आहे. तीर्थक्षेत्र श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट तर्फे श्री पिंपळेश्वर महादेव भक्त मंडळाने महाशिवरात्री उत्सव सार्वजनिक स्वरूपात होणार नसल्याचे जाहीर केले आहे. महादेव भक्त मंडळाने कोविड-१९ (कोरोना)च्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक उत्सवाबाबतच्या नियमांचे पालन करण्यासाठी गुरूवार ११ मार्च व शुक्रवार १२  मार्च रोजी महाशिवरात्री उत्सव सार्वजनिक स्वरूपात होणार नाही असे भक्तांना कळविले आहे. महाशिवरात्रीच्या ११  व १२  मार्च रोजी तीर्थक्षेत्र श्री पिंपळेश्वर मंदिरात भाविकांनी दर्शनाचा लाभ घेता येणार नाही. त्याकाळात दर्शनासाठी येऊ नये. भक्तांसाठी दोन दिवस दर्शन सेवा बंद आहे. तरी महादेव भक्तांनी या दोन दिवसात सहकार्य करावे असे सांगितले. तिर्थक्षेत्र श्री पिंपळेश्वर महादेव मंदिराचे नित्य नियमाचे विधीपूजा पुरोहितांनी ठराविक भक्तगणांच्या उपस्थितीत पार पडणार आहेत. इतर भक्तांना यामध्ये सहभागी करून घेतले जाणार नाही. श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे गणपती मंदिरात ही महाशिवरात्री उत्सव साजरा केला जातो. पण यंदा या उत्सवासाठी भक्तांना मंदिरात प्रवेश नाही मंदिरातील पुजारी दरवर्षी प्रमाणो सर्व पूजा विधीवत करणार आहेत. खिडकाळेश्वर महादेव मंदिर महाशिवरात्रीसाठी सजविण्यात आले आहे. पण महाशिवरात्री उत्सवासाठी ग्रामस्थ आणि भक्तांना हे मंदिर बंद राहणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post