कल्याण : ( कुणाल म्हात्रे )
कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज, मिलिंदनगर जवळ असलेल्या पोलीस वसाहतीत असणाऱ्या पाण्याच्या टाकीला गळतीने
ग्रासले असुन लाखो लीटर पाणी वाया जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग या पाण्याच्या
टाकीची दुरूस्ती कधी करणार असा सवाल यानिमित्ताने उभा ठाकला आहे.
कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज नजीक असलेल्या पोलिस वसाहतीच्या पाण्याच्या
टाकीला गळतीचे ग्रहण लागले असुन सुमारे चाळीस वर्षीपासुन बांधलेल्या या टाकीची
डागडुजी देखील केली गेली नसल्याचे मनसे पदाधिकारी सुनील उतेकर यांनी सांगितले.
रविवारी सकाळी पोलीस वसाहतीतील पाण्याची टाकीला गळती लागल्याने लाखो लीटर पाणी
वाया गेले. तसेच बाजूच्या दुकानाच्या छपरावरून पाण्याचे लोट रस्त्यावर वाहु लागले.
याबाबत "ब" प्रभागक्षेत्र पाणी पुरवठा आधिकारी यांच्याशी संपर्क
साधून पाणी गळती बाबत निर्दशानास आणुन दिले. परंतु पाण्याच्या टाकीची दुरूस्ती ही
बाब सार्वजनिक बांधकाम विभागाशी निगडीत असुन त्यांनी दुरूस्ती करणे गरजेचे आहे. पाणी
पुरवठा करणे हे मनपाशी निगडीत असुन पाणी पुरवठा बंद केल्यास पोलीस वसाहतीमधील
पोलीस कुटुंबीयांचा पाण्याचा प्रश्न उभा राहिल अशी भुमिका मांडली. तर सार्वजनिक
बांधकाम विभाग उप अभियंता प्रशांत मानकर यांच्याशी संपर्क साधला असता फोन घेण्याची
तसदी देखील घेतली नाही."
पोलीस
वसाहतीतील पाण्याच्या टाकीच्या गळतीचा प्रश्न ऐरणीवर आल्याने पोलीस वसाहतीच्या
दुरुस्ती प्रश्नाबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग कधी लक्ष देणार, असा सवाल उभा ठाकला आहे. मनसे
पदाधिकारी सुनिल उतेकर यांनी पोलीस वसाहतीच्या देखभाल दुरूस्तीची मागणी करणार असल्याचे सांगितले .
Post a Comment