कल्याण ( रोशन उबाळे ) :- शहराची शोभा आणि सुंदरतेत भर पडण्यासाठी मुख्य रस्त्यावर किंवा मोक्याच्या ठिकाणी उद्यान उभारली जातात मात्र प्रभाग क्र ३८ रामबाग सिंडिकेट भागात यशवंतराव चव्हाण मैदानाजवळ कल्पना चावला उद्यानाला उतरती कळा लागली आहे वनराई ला आगीच्या भक्ष्यस्थानी देऊन त्या ठिकाणी बकालपणे कलिंगडाचे दुकान थाटले आहे त्यामुळे मोक्याच्या ठिकाणी परिसर विद्रुपीकरण झाले असून कोणाच्या आशीर्वादाने दुकान थाटले आहे असा प्रश्न निर्माण होत आहे
कोरोना काळात वर्षभर नागरिक घरात बँद होते त्यांना विंरुगळा म्हणून मैदाने उद्याया ने आनंदात भर घातल असतात त्यात आता मोक्याचे उद्यायाने व्यवसायासाठी वापर होताना दिसत आहे प्रभाग क्र ३८ मध्ये मॅक्सी गाऊड जवळ प्रेमी सेवा मंडळ यांच्या पाठपुराव्याने कल्पना चावला उद्यान उभारण्यात आला आहे त्याठिकाणी पालिका आणि खाजगी व्यापारी पडीक साहित्य ठेवीत असत त्यानंतर त्या ठिकाणी झाडे आणि कुंपण करून छोटीखाणी उद्यान तयार करण्यात आले आहे मात्र आर्थिक लोभासाठी स्थानिक नेते आणि प्रतिनिधी यांच्या आर्थिक दुर्लक्ष मुळे त्या ठिकाणी फळांचे दुकान थाटले आहे त्यामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे आणि पालिका प्रशासन उद्यान अधिकारी काय? झोपा काढतात का असा ही प्रश्न विचारला जात आहे
दरम्यान या उद्यानाला नासा मधील शास्त्रज्ञ कल्पना चावला यांचे नाव देण्यात आले आहे त्याचे नावाचे पालिका प्रशासनाने विद्रुपीकरण थांबवावे अशी मागणी होऊ लागली आहे.
Post a Comment