टिटवाळ्यातल्या वस्तु संग्रहालयात अविनाश हरड यांच्या अश्वमेध फाऊंडेशनच्या माध्यमातुन उल्हास नदी खोऱ्यातील पुरातन वस्तुंचा खजिनाच उपलब्ध झालाय

 


ॲड. जयेश वाणी

टिटवाळा: टिटवाळ्यातल्या वस्तु संग्रहालयात अविनाश हरड यांच्या अश्वमेध फाऊंडेशनच्या माध्यमातुन उल्हास नदी खोऱ्यातील पुरातन वस्तुंचा खजिनाच उपलब्ध झालाय. याच वस्तुसंग्रहालयाला पुढे घेऊन जाण्याचं काम अविनाश हरड यांच्या बरोबरीने ख्यातनाम मुर्तीकार प्रशांत गोडांबे यांनी हाथी घेतलं. कामही असं की लाईफ लिजंड असणाऱ्यांच्या हातांचे ठसे जतन करण्याचं. सिंधुदुर्ग किल्ल्यात  छत्रपती महाराजांच्या पायाचा ठसा उपलब्ध आहे तर लंडनच्या मादाम तुसाद पासुन लोणावळ्याच्या संग्रहालयात अनेक महान माणसांच्या मेणाचे पुतळे बघायला मिळतात. याच धर्तीवर प्रशांत गोडांबे 


यांनी लोकोत्तर कार्य करणाऱ्यांचे हाथ पुढच्या ५०० वर्षांसाठी जतन करण्याचा प्रयत्न सुरु केलाय.

या हाताचे ठसे घेण्याच्या कार्याची सुरवात आंतराष्ट्रीय ख्यातीचे सर्जन असणारे, सुमारे दोन लाख डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करणारे सर्जनशिल डॅाक्टर पद्मश्री डॅा. तात्याराव लहाने यांच्या हाताचे ठसे घेऊन करण्यात आली. दि. ११ मार्च रोजी  महाशिवरात्रीच्या दिवशी मुंबईतल्या सर जे. जे. इस्पीतळात तात्यांच्या हाथाचे ठसे घेण्यात आले. हातावरील अत्यंत बारीक खुणाही या प्रक्रीयेद्वारे जतन केल्या जातात. बायोमेट्रीक सुरक्षा पाळण्यासाठी  बोटांचे ठसे पुसुन टाकून बाकी हाताचा हुबेहुब ठसा मिळवण्याचं कसब प्रशांत गोडांबे यांनी प्राप्त केलंय. लाखो दृष्टीहिनांच्या आयुष्यात देवतुताचा स्पर्श लाभलेल्या तात्यांनी उजेडाची कवाडं उघडी केलीत. लाखोंना प्रकाषाची जाणीव आणि रंगांचा आनंद मिळवून देणारे हाथ पुढच्या पाचशे वर्षातील पिढ्यांना केवळ बघायलाच मिळतील असे नाही तर भावी पिढ्यांना प्रेरणाही मिळवून देतील. तात्यारावांच्या हाताचे ठसे टिटवाळ्यातील वस्तुसंग्रहालयात लौकरच सर्वसामान्यांना बघण्यासाठी उपलब्ध होतील अशी माहिती अविनाश हरड आणि प्रशांत गोडांबे यांनी दिली. मांडा-टिटवाळाकरांसाठी एक नवा सांस्कृतिक खजिना लौकर खुला होतोय. तात्यांचे ठसे  मिळवण्यासाठी ॲड. जयेश वाणी, संजय पारेकर आणि ॲड. संजय भोजणे यांनी मेहनत घेतली.


Post a Comment

Previous Post Next Post