( निलेश कासट - पालघर जिल्हा प्रतीनिधी )
डहाणू - डहाणू तालुक्यातील आदिवासी विकास प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रम शाळा आंबेसरी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक उत्तम हिंदुराव भोसले यांना पालघर/ठाणे लाच लुचपत विभागाने दोन हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.
यातील तक्रारदार हे शासकीय माध्यमिक आश्रमशाळा अंबेसरी येथे क्रीडा शिक्षक
असून आलोसे हे त्यांचे मागील वर्षाचे पगार बिल पास करणेकामी ३,०००/- रु. ची मागणी करीत होते म्हणून तक्रारदार यांनी एसीबी पालघर येथे तक्रार दिली त्या अनुषंगाने आज दि.०९/०३/२०२१ रोजी तक्रारदार यांना पंचासह आलोसे यांचे कार्यालयात पडताळणी करणेकरीता पाठवले असता आलोसे यांनी तक्रारदार यांना २,०००/- रु. लाचेची मागणी केली व शासकीय माध्यमिक आश्रमशाळा आंबेसरी येथे तक्रारदार यांचेकडून लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सदरची कारवाई लाच लुचपत पालघर विभागाचे उपअधीक्षक नवनाथ जगताप व ठाणे पोलीस लाच लुचपत अधीक्षक पंजाबराव उगले व मुकुंद हातोटे यांच्या मार्गदर्शनाखाली भारत साळुंखे, पोलीस निरीक्षक, मपोह/मांजरेकर, पोना/सुतार, पोना/ सुमडा, चापोशि/ दोडे यांनी केली आहे
Post a Comment