कुणाल म्हात्रे - कल्याण
वाढत्या इंधनदरवाढीचा निषेध करण्यासाठी कल्याणमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बैलगाडीतून प्रवास केला. तसेच अच्छे दिनाच्या खोट्या आश्वासनांच्या निषेधार्थ पेट्रोल पंपावर नागरिकांना मिठाई वाटप करण्यात आली.
नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने नागरीकांवर अन्याय करीत पेट्रोल १०० रू दरवाढ केली आहे. मोदी सरकारने फसवे अछेदिन आणुन, लोकांना कोरोना महामारी काळात हेतुपुरस्कर पेट्रोल दरवाढ करून वेठीस धरलेल्या केंद्र सरकारचा धिक्कार करीत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा सचिव प्रशांत माळी, युवक शहर अध्यक्ष योगेश माळी, युवक कार्याध्यक्ष प्रकाश हरड, किशोर पटेल, जिवन वाघमारे, वार्ड अध्यक्ष रफीक शेख आदींनी बैलगाडी वर प्रवास करुन, नागरींकांना देशोधडीना लावण्याचे पाप व त्यांच्या आर्थिक जिवणाचे खच्चीकरन केलेल्या केंद्र सरकारचा निषेध करीत, जनतेचे आयुष्य कडु करणाऱ्या केंद्र सरकारच्या निषेधार्थ मिठाई वाटली.
नागरींकानी देखील ही मीठाई खात आम्हाला अच्छेदिन हे बुरेदिन होते हे आता कळाले हे कबुल केले असल्याची माहिती प्रशांत माळी यांनी दिली.
Post a Comment