टिटवाळा : जीवनदीप महाविद्यालय गोवेली येथे कीर्तनकार महाराजांच्या जाहीर सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.सर्व कीर्तनकार मंडळी व राजकीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा पार पडला.यावेळी उपस्थित मंत्री उच्च व तंत्रशिक्षण महाराष्ट्र राज्य चंद्रकांत दादा पाटील, आमदार मुरबाड विधानसभा किसन कथोरे, आमदार नरेंद्र पवार , उल्हासनगर चे आमदार कुमार आयलानी यांची विशेष उपस्थिती होती तसेच मठाधिपती स्वामी समर्थ मठ नवनित्यानंद महाराज उर्फ मोडक महाराज, तसेच एकूण ८० प्रसिद्ध कीर्तनकारांची या भव्य सोहळ्यात उपस्थिती होती. तसेच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वर्ग विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.सर्व कीर्तनकार व राजकीय पदाधिकारी व पत्रकारांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.आलेल्या मान्यवरांचे लेझीम पथकाने व फुलांच्या वर्षावाने स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयाचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे यांनी प्रास्ताविक केले .
यामध्ये त्यांनी महाविद्यालयाविषयी व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांविषयी गौरवास्पद उद्गार काढले काढले; तसेच महाविद्यालयातील शिक्षण शाखांविषयी, जिमखाना विभाग, मास मीडिया विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग या विषयी माहिती सांगितली.जीवनदीप महाविद्यालयात घोडविंदे सरांनी खूप छान उपक्रम राबवला असून समाजात बदल घडणारे कीर्तनकार यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला म्हणून चंद्रकांत दादा पाटील यांनी सरांचे कौतुक केले. या भागात कौशल्य विकासावर भर द्या जेणेकरून रोजगाराच्या विविध संधी या भागात तरुणांना उपलब्ध होतील असा आग्रह त्यांनी केला. तसेच या ग्रामीण भागात लॉ कॉलेज स्थापन केलं असल्याने त्यांनी घोडविंदे सरांचे कौतुक केले.मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
यानंतर महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाचे प्रमुख प्रा.राजाराम कापडी यांच्या ग्रंथालय संघटक, डॉ. सुनीलदत्त गवरे यांच्या संतांचे तत्त्वज्ञान, दृष्टी मित्र-साकीब गोरे यांच्या कार्यावर आधारितय पुस्तकाचे तसेच भाजपच्या किसन मोर्चा ची पुस्तिका यावेळी प्रकाशन करण्यात आले. माजी आमदार नरेंद्र पवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत झुंजारराव यांनी केले कार्यक्रमावेळी महाविद्यालयाचा जीवनदीप अंक उपस्थित असलेल्या मान्यवरांना वाटप करण्यात आला. आलेल्या सर्व कीर्तनकार मंडळींचा विठ्ठल रुक्मिणी ची प्रतिमा देऊन तसेच पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .
Post a Comment