विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद एकाच दिवसात ९५ बॅग्स रक्त संकलन
कल्याण : जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेतर्फे कल्याण येथील लक्ष्मण देवराम सोनवणे कॉलेज येथे शुक्रवारी रक्तदान शिबिर संपन्न झाले. लक्ष्मण देवराम सोनवणे कॉलेज येथील रक्तदान शिबिरास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन सोनवणे कॉलेजचे प्राचार्य एनी अँथोनी, उपप्राचार्य राजदीप मोरे, जिजाऊ सामाजिक संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अजित जाधव यांनी केले.
जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निलेश भगवान सांबरे यांच्या जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण कोकण परिसरात विविध लोकोपयोगी शिबिरे आयोजित करतात, जसे नेत्र चिकित्सा शिबिर, कॅन्सर डिटेक्शन शिबीर, हृदय तपासणी शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, संपूर्ण शारीरिक तपासणी शिबिर, मोतीबिंदू ऑपरेशन शिबिर, असे विविध प्रकारचे उपक्रम संस्था नियमितपणे राबवत असते.
राष्ट्रीय सेवा योजना (एन एस एस) अंतर्गत शुक्रवारी लक्ष्मण देवराव सोनवणे कॉलेज कल्याण येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन ९५ बॅग्स रक्तसंकलन करून सोनवणे कॉलेजने नवीन विक्रम नोंदविला. विद्यार्थी व शिक्षक वर्गाने मोठ्या उत्साहात रक्तदान केले
एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्तसंकलन झाल्याने कॉलेजच्या प्राचार्य एनी अँथोनी, उपप्राचार्य राजदीप मोरे, डॉक्टर अतुल पांडे मान्या हरध्वाणी, हेड क्लर्क अतुल पांडे जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अजित जाधव यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
रक्तदान शिबिर यशस्वी करण्यात साठी नवजीवन ब्लड बँक ठाणे, रेनी रोय, राजश्री शिंदे, मोहन भोईर, संदीप उंबरसाडा, सोमनाथ बांगर, अम्रित रिझवी, पुरुषोत्तम यादव,
जिजाऊ सामाजिक संघटनेचे संदीप शेंडगे, साहिल मगर, अपेक्षा माळी, अश्विनी झगडे रिजवान शेख यांनी परिश्रम घेतले.
Post a Comment