१३ हून अधिक प्रसिद्ध कलाकारांसमवेत...कल्याणमध्ये सोमवारी दिवाळी पहाट

कपिल पाटील फौंडेशनकडून आयोजन


कल्याण, दि. १९ (प्रतिनिधी) : भाजपा व कपिल पाटील फाऊंडेशनच्या वतीने कल्याणमधील साई चौकात सोमवारी (ता. २४) भव्य दिवाळी पहाट कार्यक्रम होत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील १३ हून अधिक दिग्गज गायक व कलाकारांच्या उपस्थितीत रसिकांना सूरांच्या गजरात दिवाळीचे स्वागत करता येणार आहे.
कल्याण येथील खडकपाडा परिसरातील साई चौकात सोमवारी पहाटे पाच वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल. प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत, सावनी रविंद्र, प्रसिद्ध कलाकार अमृता खानविलकर, नेहा पेंडसे, नम्रता संभेराव, चेतना भट, समिरा गुजर, वनिता खरात, गौरव मोरे, प्रसाद खांडेकर, श्याम राजपूत आदी कलाकारांच्या कलाविष्कारांनी उजळलेली दिवाळी पहाट रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे दिवाळी पहाट आयोजित करण्यात आली नव्हती. मात्र, यंदा अपूर्व उत्साहात दिवाळी पहाट होत आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post