के.बी.के इंटरनॅशनल स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न


टिटवाळा : केबीके इंटरनॅशनल स्कूल टिटवाळा पूर्व यांचे पाचवे वार्षिक स्नेहसंमेलन कल्याण पश्चिम येथील अत्रे रंगमंदिर कल्याण येथे आयोजित करण्यात आले होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारात कला गुण सादर करून उपस्थितांची  मने जिंकली.अध्यक्षस्थानी सुबराव खराडे तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ कवी व गीतकार जान निसार अख्तर यांचे सुपुत्र तसेच जावेद अख्तर यांचे लहान बंधू शाहिद अख्तर व स्वयं शैक्षणिक संस्था अध्यक्षा अर्चना नाईक यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्या डॉ.कल्पना नवले यांनी संस्थेच्या सचिवा  ज्योती खराडे यांच्या सहयोगाने करण्यात आले होते. 

३० जानेवारी हुतात्मा दिवस असल्याने सर्व हुतात्मा आणि महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यात आले . गणेश वंदना करून कार्यक्रमास सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर नृत्य सादर करून दाद मिळवली. नृत्य, गायन यांचे दिग्दर्शन शाळेतील  शिक्षकांनी केले होते .  तसेच शालेय उपक्रमांध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.



Post a Comment

Previous Post Next Post