डोंबिवली ( शंकर जाधव )
काही दिवसांपूर्वी कल्याण पूर्व रेल्वे स्टेशन स्कायवॉक वरून एक गरोदर महिला रुक्मिणी बाई हॉस्पिटल येथे जात असताना प्रसूतीच्या वेदना होऊन स्कायवॉक वरच नवजात बाळाला जन्म दिला.प्रसंगावधान दाखवत रिक्षा चालक संजय जगताप व त्यांचे इतर रिक्षा चालक सहकारी यांनी सदर महिलेस व बाळाला सुखरूप खाजगी रुग्णवाहिनीतून हॉस्पिटल मध्ये दाखल केले.या रिक्षा चालकांचा कल्याण वाहतूक विभाग स.पो.आ. मंदार धर्माधिकारी , कोळशेवाडी वाहतूक उपविभागाचे प्रभारी व.पो.नि रवींद्र क्षीरसागर साहेब यांनी कोळसेवाडी वाहतूक उप विभाग कार्यालय, चक्कीनाका येथे पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन कौतुक केले.
Post a Comment