सहज योगावर आधारित महालक्ष्मी पथला डोंबिवलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कल्याण : कुणाल म्हात्रे
श्री निर्मलादेवी माताजी यांनी १९७० साली भारतीय अध्यात्मिक संस्कृती सर्व सर्वसामान्य गृहकुटुंबातील लोकांना परमेश्वर प्राप्ती करून देण्याचे कार्य आरंभिले व भारतासह जगातील १४० देशांनी भारतीय अध्यात्मिक संस्कृतीवर आधारित सहजयोग अभ्यास पद्धतीचा स्वीकार केला. यामध्ये श्री माताजी यांनी म्हटले होते की सहजयोग हा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे. कारण परमेश्वराची शक्ती ही मानव उत्क्रांतीसाठी निर्माण झाली आहे. यामध्ये प्रचार प्रसार होणे गरजेचे आहे. यामुळे दिग्दर्शक निर्माता डॉ. संजय तलवार यांनी पाच वर्षांपूर्वी ``गृहलक्ष्मी पथ'' नावाचा चित्रपट प्रदर्शित केला होता व आता ``महालक्ष्मी पथ'' चित्रपट बनवून सर्वसामान्य लोकांना श्री माताजींच्या सहजयोगापासून साधकास कशा प्रकारे लाभ होतो याचे वर्तमान स्थितीतील परिस्थितीचे दर्शन घडविले.
या चित्रपटात तरुण पिढी नशेच्या माध्यमातून कशा प्रकारे फसली जाते व त्यांना सहज योगी साधक कसे मदत करतात. श्री माताजी चैतन्याद्वारे कशाप्रकारे संरक्षण करतात याचे उदाहरण दाखविले आहे. तरुण पिढी वाईट संगतीला लागून नशाबाज होतात. परंतु कुटुंबात एखादी व्यक्ती सहजयोगी असेल तर संपूर्ण कुटुंब सुरक्षित राहते आणि त्यांचे प्रत्यक्ष अनुभव भारतातील लाखो सहजयोगींना आला आहे असे अनेक प्रसंग डॉ. संजय तलवार यांनी चित्रपटाच्या माध्यमातून दाखविले आहे.
या चित्रपटास अनेक प्रदेशात विविध पारितोषिक मिळाले आहेत. तर भारतातील चित्रपट सृष्टीतील सर्वात मोठा पुरस्कार दादासाहेब फाळके हा पुरस्कार ``महालक्ष्मी पथ''ला घोषित झाला. विशेष म्हणजे डोंबिवली शहरातील ज्येष्ठ सहजयोगी नारायण अय्यर यांनी त्यांचे सहकार्य राजेश केसरकर, राजेश देशमुख, मंगेश जानवलकर, विराज नामकर, प्रशांत देसाई, प्रशांत शेट्टी आदींनी सहकार्याने डोंबिवली मधुबन सिनेमागृहात नवीन सहजयोगी साधकांसाठी महालक्ष्मी पथ चित्रपट प्रदर्शित करुन श्री माताजींचा सहजयोग कसा आहे त्याचे दर्शन घडविले.
चित्रपटानंतर ज्येष्ठ सहजयोगिनी शोभा यांनी सिनेमागृहातील नवीन साधकांना चक्राविषयी माहिती देऊन प्रत्यक्ष कुंडली शक्तीचे जागरण करून आत्मकक्षात्कार दिला. बर्याच नवीन साधकांनी आपले अनुभव कथन केले.
Post a Comment