सहव्यवस्थापकीय संचालक श्री. रिचर्ड यानथन यांची कल्याण परिमंडलाला सदिच्छा भेट !




कल्याण: १० जून २०२४


महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे नवनियुक्त सहव्यवस्थापकीय संचालक श्री. रिचर्ड यानथन (भाप्रसे) यांनी कल्याण परिमंडल कार्यालयाला सोमवारी (१० जून) सदिच्छा भेट दिली. कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी त्यांचे स्वागत‍ केले.

 

श्री. रिचर्ड यानथन यांनी सोमवारी सकाळी कोकण प्रादेशिक विभागाच्या सहव्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार स्वीकारला. मुख्य अभियंता औंढेकर यांच्या विनंतीनुसार त्यांनी कल्याण परिमंडल कार्यालयाला सदिच्छा भेट देत अधिकारी, अभियंत्यांशी संवाद साधला. वीज वितरण क्षेत्र त्यांच्यासाठी नवीन असल्याचे सांगत फिल्डवर उतरून शाखा कार्यालयापर्यंत पोहचणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी कल्याण मंडल एकचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील, पालघर मंडलाचे अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे, स्थापत्य मंडलाचे अधीक्षक अभियंता विजय मोरे, पायाभूत आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता महेश अंचिनमाने, सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे उपसंचालक सुमीत कुमार, माहिती तंत्रज्ञान विभागाचे उप महाव्यवस्थापक योगेश खैरनार, मानव संसाधन विभागाचे सहायक महाव्यवस्थापक धैर्यशील गायकवाड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर यांच्यासह कार्यकारी अभियंते, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post