डहाणु निलेश कासट: डहाणू मधील आगवन येथील विधवा महिलेला जिजाऊ संस्थेची घर बांधणीसाठी आर्थिक मदत

पालघर (निलेश कासट -उपसंपादक ):-निलेशजी सांबरे  संस्थापित जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था नेहमीच गोरगरिबांच्या मदतीसाठी धावून जाते. जिजाऊ संस्थेच्या परोपकाराचा प्रत्यय मदतीची गरज असणाऱ्या डहाणूमधील आगवन गावच्या स्थानिक रहिवासी पारूताई यांना अलीकडेच आला.  तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचून त्यांचा उत्कर्ष साधण्याच्या हेतूने जिजाऊ संस्था ठिकठिकाणी जिजाऊ संघटना शाखा उभारत आहे. या शाखांद्वारे गरजवंतांना आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी एक मंच प्राप्त होत आहे. जिजाऊ संघटना, आगवन शाखेच्या उद्घाटनप्रसंगी येथील रहिवासी पारू गोरखाना यांची जिजाऊ परिवारातील सदस्यांनी भेट घेतली. पारुताईंची घरची परिस्थिती अत्यंत बिकट असून, घर मोडकळीस आले आहे. घर पडक्या अवस्थेत असल्याने त्यांचे आणि त्यांच्या दोन लहान बालकांचे अतोनात हाल होत होते. मन हेलावून टाकणाऱ्या या परिस्थितीची माहिती जिजाऊ संस्था पालघर जिल्हा महिला सक्षमीकरण अध्यक्षा सौ. हेमांगीताई हिरामण पाटील व सदस्य जावेद खान यांना मिळाली आणि जिजाऊ संस्थेकडून त्यांना त्वरित आर्थिक मदत करत आधार देण्यात आला. एवढेच नाही तर, जिजाऊ संघटना, आगवन शाखा सदस्यांमार्फत श्रमदानाद्वारे त्यांचे घर नव्याने उभारण्यात येणार असल्याचे आश्वासन दिल्यावर पारुताईंनी भावनाविवश होत जिजाऊ संस्थेचे आभार मानले. 

सर्व उपस्थितांनी जिजाऊ संस्था आणि त्याचे आधारस्तंभ असणाऱ्या श्री. निलेशजी सांबरे यांच्या दातृत्वाची मनःपूर्वक प्रशंसा केली.


1 Comments

  1. Welcome to Bet365 casino mobile app - JT Hub
    Bet365 Casino Mobile App. Bet365 is one of the leading 제천 출장안마 sports betting networks in the 이천 출장마사지 world, having entered 강원도 출장마사지 the scene in 이천 출장샵 2006. In 포천 출장마사지

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post