टिटवाळयातील पोस्ट कार्यालयाची कर्मकहाणी
पोस्ट कार्यालयात शिरते पावसाचे आणि गटाराचे पाणी
मोडकळीस आलेल्या वास्तुमध्येच करावे लागते काम
टिटवाळा :(अजय शेलार ) १९७६ साली सुरु झालेल्या मांडा टिटवाळा परिसरात असलेल्या पोस्ट कार्यालयात कालांतराने सुविधात्मक बदल न केल्याने पावसाचे आणि गटाराचे पाणी शिरून दुरावस्था झाल्याने तश्याच दुर्गंधी आणि चिखल पसरलेल्या इथल्या कर्मचारी वर्गाला टपालसेवेचा गाडा हाकावा लागत आहे. त्यातच येथील विजेचा चालू असलेला लपंडाव आणि इंटरनेट सर्व्हर डाऊन असल्याची कर्मकहाणी इथल्या नागरिकांना रोजच ऐकावी लागत असल्याने टिटवाळयातील पोस्ट कार्यालयाचे आणि टपाल सेवेचे तीनतेरा वाजलेले पाह्याला मिळत आहे.
वाढलेली लोकसंख्या त्यामुळे पर्यायाने वाढलेला टपालाचा भार मात्र त्या तुलनेत असलेला अपुरा कर्मचारी वर्ग, येणारे पेन्शनर, दूरध्वनी ग्राहक, आधार सेवा या सगळ्यांची खिडकीवर असलेली नेहमीची गर्दी ,मोडकळीस आलेले आणि भंगार झालेल्या टेबल खुर्च्या आणि मोडकलीस आलेली वास्तु या सगळ्यांच्या जीवावर हे पोस्ट कार्यालय इथे तग धरून अहे .
मांडा टिटवाळ्यातील हे पोस्ट कार्यालय १९७६ साली सुरु झाले होते.इथल्या कर्मचारी वर्गाची बदली सोडुन अद्याप तरी २०१८ सालातही इथे काहीच बदललेले दिसत नाही. हे कार्यालय सुरु झाले तेव्हा हा परिसर ग्रामपंचायतीत होता. त्यावेळी एक पोस्टमास्तर ,दोन ग्रामीण डाकसेवक , एक शिपाई एवढे कर्मचारी पंचक्रोशितल्या गावांना टपालसेवा पुरवत होते . मात्र १९८३ साली या विभागाचा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत समावेश झाला शहरीकरण होत असताना नागरीकरण देखील मोठ्या प्रमामात वाढले .काही हजारांच्या घरात असलेली लोकसंख्या लाखांच्या घरात पोहचली त्याबदल्यात कर्मचारी मात्र वाढवले न गेल्याने सहाजिकच इथल्या
टपाल सेवेवर याचा ताण आला. मांडा पश्चिम पोस्ट ऑफिस कार्यक्षेत्रातच मांडा पुर्व तसेच ग्रामीण भागही संलग्न असलेल्या दोन बिटची रचना आहे. एवढ्या मोठ्या परिसरासात दररोज साधार २००० च्यावर पत्र ,स्पिडपोस्टची ५०० पत्र ,रजिस्टर ८०ते ९० ,१५ ते २० पार्सल, मनीऑर्डर हा सारा बोजा इथल्या अपूऱ्या कर्मचारी वर्गावर आहे . ही झाली कर्मचारी वर्गाची कथा तर या कार्यालयाची वास्तु म्हणजे एखाद्या जुन्या चित्रपटातले खंडर अथवा पुऱानी हवेली पाहिल्याचा भास व्हावा इतकी भयानक आहे. ही भग्न झालेली वास्तु कधी कोसळेल याचा नेम नाही .त्यामुळे इथले कर्मचारी जिव मुठीत घेउन वारंवार छताकडे पाहतच काम करताना दिसतात . अपूऱ्या जागेतच सामावलेले कर्मचारी आणि फायली,बस्तान, टेबल, खुर्चा सार काही आणि काउंटरवर तर लांबच लांब रांगा लावुन उभ्या राहणाऱ्या ग्राहकांना पाठ झालेली कर्मकहाणी . पोस्ट कार्यालय झाल्यापासु एकूण ४२ वर्ष उलटुन यात काडीमात्र फरक नाही . या टपालसेवेला हैराण झालेल्या नागरिकांतुन इथे सुसज्ज नको पण निदान सुस्थितीत तरी हे पोस्ट कार्यालय आणि इथली सुविधा मिळावी अशी माफक अपेक्षा केली जात आहे .
नवीन पोस्ट ऑफिस झालं पाहिजे टिटवाळा मध्ये खूप प्रमाणात लोक संख्या वाढली आहे
ReplyDeleteप्रतिक्रियेसाठी धन्यवाद!!!
DeletePost a Comment