अखेर सभापतींनी रस्त्यावर उतरून रिक्षाचालकांना झापले...
डोंबिवलीतील सर्वात महत्वाचा चौक असणाऱ्या इंदिरा चौकाचा बेेशिस्त रिक्षाचालकांनी ताबा घेतला असून नागरिक या परिस्थितीला पुरते वैतागले आहेत.दोन दिवसांपूर्वी याच चौकात उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी संजय ससाणे यांनी रिक्षाचालकांना शिस्तीचे धडे दिले होते. त्यावेळी काही रिक्षाचालकांनी भररस्त्यात शिस्तीची शपथ घेतली होती.मात्र पुन्हा परिस्थती जैसे से थे असल्याने गुरुवारी स्थायी समिती सभापती राहूल दामले यांनी सकाळी या चौकात बेशिस्त रिक्षाचालकांना चांगलेच झापले.
(मुंबई डेटलाईन 24 डोंबिवली प्रतिनिधी - शंकर जाधव)
डोंबिवलीतील सर्वात महत्वाचा चौक असणाऱ्या इंदिरा चौकाचा बेेशिस्त रिक्षाचालकांनी ताबा घेतला असून नागरिक या परिस्थितीला पुरते वैतागले आहेत.दोन दिवसांपूर्वी याच चौकात उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी संजय ससाणे यांनी रिक्षाचालकांना शिस्तीचे धडे दिले होते. त्यावेळी काही रिक्षाचालकांनी भररस्त्यात शिस्तीची शपथ घेतली होती.मात्र पुन्हा परिस्थती जैसे से थे असल्याने गुरुवारी स्थायी समिती सभापती राहूल दामले यांनी सकाळी या चौकात बेशिस्त रिक्षाचालकांना चांगलेच झापले.
जवळपास तासभर सभापती दामले हे इंदिरा चौकात स्वतः उभे राहून बेशिस्त रिक्षाचालकांना सूनावात होते.सभापती आले असल्याचे समजतात वाहतूक पोलीस त्या चौकात हजर झाले.सभापती दामले यांनी वाहतूक पोलिसांच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केला.काही वेळ हा चौक बेशिस्त रिक्षाचालकांपासून मुक्त झालेला दिसला.याबाबत सभापती दामले यांना विचारले असता ते म्हणाले, मी वाहतूक पोलिसांना सांगितले आहे की, जर तुम्ही चौकात नियमाचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करत नसाल तर नागरिक म्हणून आम्हाला रस्तावर उतरून वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी लागेल.दरम्यान , येथील अनेक बेशिस्त रिक्षाचालक रिक्षा युनियनच्या नावाचा वापर करून वाहतुकीचे नियम पळत नसल्याचे दिसते.
Post a Comment