डोंबिवली तील भोपर गावातील जे के इंग्लिश स्कुल च्या संचालकांची पर्यावरणाविषयी  नामी संकल्पना!

विद्यार्थी दशेत पर्यावरणाची आवड निर्माण व्हावी याकरिता संचालकांचा प्रयत्न !

शाळेतील जो विध्यार्थी  १ झाड लावेल त्याची जोपासना करेल त्यास  १० गुण  ग्रेस  म्हणून दरवर्षी दिले जाणार 

 डोंबिवली :  डोंबिवलीजवळील भोपर गावात धर्मा चॅरिटेबल ट्रस्ट आणि जे.के.पाटील इंग्लिश स्कुलच्या वतीने आषाढि एकादशी निमित्त
शाळकरी विद्यार्थ्यानी दिंडी काढण्यात आली होती
जे.के.इंग्लिश स्कुलच्या  काढलेल्या दिंडीत विठूनामाच्या गजराने भोपर गाव दुमदुमले.विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील ओसंडून वाहणाऱ्या आनंदाचे छायाचित्रण  गावकऱ्यांनी केले.गावातील विठ्ठल रखुमाईच्या मंदिराच्या प्रांगणात  विद्यार्थ्यांची दिंडी क्षणभरासाठी स्थिरावल्यावर  झुगडी आणि जेझील यात दंग झाली. गावातुन पुढे ही दिंडी मारुतीच्या देवळासमोर देखील वारकरी झालेल्या विद्यार्थ्यांनी फेर धरून विठू नामाचा जयजयकार केला.विठू नामाच्या गजरात टाळ-मृदुगांच्या तालावर पावले टाकत गावातुन गेली.अकरा संत झालेल्या विद्यार्थ्यांचे मोबाईलने फोटो काढले.यावेळी शाळेचे संस्थापक गजानन पाटील ज्या प्रमाणे माध्यमिक विद्यार्थ्यांना शाळेच्या अभ्यासासोबत पर्यावरण संवर्धनची आवड विद्यार्थीं दशेपासून निर्माण व्हावी म्हणून शाळेच्या वतीने यंदाच्या वर्षांपासून  झाडे लावून त्याची जोपासना करणाऱ्या विद्यार्थ्यांला परीक्षेत १० गुण ( ग्रेस) म्हणून दिले जाणार असल्याचे संगीतले.


शंकर जाधव, मुंबई डेटलाईन २४, डोंबिवली

Post a Comment

Previous Post Next Post